ETV Bharat / city

Operation Santosh Jadhav : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी गुजरातेतून उचलले; वाचा सविस्तर, ऑपरेशन संतोष जाधव

सिद्धू मुसेवाला हत्येनंतर जेव्हा 8 आरोपींचे फोटो आणि नाव समाज माध्यमातून समोर आले. तेव्हा त्यात संतोष जाधव आणि सौरव महाकाल संशयित असल्याचे समोर आले. एकूणच संतोष जाधव हा मंचर येथील हत्येच्या प्रकरणानंतर फरार होता आणि अचानक त्याचे नाव हे पुन्हा चर्चेत आले. त्याला कश्याप्रकारे पुणे पोलिसांनी चार पथके करुन मध्यरात्री झोपत असताना ताब्यात घेतले. वाचा सविस्तर.....

Sidhu Moose Wala murder case Accused Santosh Jadha
ऑपरेशन संतोष जाधव
author img

By

Published : Jun 13, 2022, 7:25 PM IST

Updated : Jun 13, 2022, 7:47 PM IST

पुणे - सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील पुण्यातील दुसरा आरोपी संतोष जाधव याला देखील पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. ऑपरेशन संतोष जाधव हे कसे राबविले गेले. याबद्दल सविस्तर...

पुन्हा नाव आले चर्चेत आणि तपास सुरू झाला - सिद्धू मुसेवाला हत्येनंतर जेव्हा 8 आरोपींचे फोटो आणि नाव समाज माध्यमातून समोर आले. तेव्हा त्यात संतोष जाधव आणि सौरव महाकाल संशयित असल्याचे समोर आले. एकूणच संतोष जाधव हा मंचर येथील हत्येच्या प्रकरणानंतर फरार होता आणि अचानक त्याचे नाव हे पुन्हा चर्चेत आले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून संतोष जाधव यांचा शोध हा गेल्या एक वर्षापासून सुरूच होता. पण त्याचा सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात त्याचा नाव समोर आल्याने पुणे ग्रामीण पोलिसांकडे एक आव्हान उभे राहील आणि तेथून पुणे ग्रामीण पोलिसांकडून कसून तपास सुरू झाला.

देशातील विविध भागात सुरू होता तपास - संतोष जाधव यांच्या तपसाकरिता पुणे ग्रामीण पोलिसांकडून 4 टीम तयार करण्यात आल्या होत्या. जिथे जिथे संतोष जाधव ट्रेस होत होता. त्या ठिकाणी त्याचा तपास सुरू होता. मुख्यत्व गुजरात, पंजाब, हरियाणा, राजस्थान या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांची टीम संतोष याला शोधत होती. अशातच संतोष याचा साथीदार सौरव महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून 8 जून रोजी अटक केली. आणि तेथून पुढे तपासाला गती मिळाली.

ऑपरेशन संतोष गुप्त पद्धतीने आला राबविण्यात - संतोष जाधव याचे नाव सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात आल्याने देशाचे लक्ष याकडे लागले. पंजाब पोलीस सहित देशातील इतर राज्यातील पोलीस संतोष याला शोधत होते. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांकडून ही मोहीम राबवित असताना ती गुपित पद्धतीने राबविण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेची माहिती पोलीस दलातील अधिकाऱ्यांना देखील देण्यात आली नव्हती.

मित्र नवनाथ सुरेश सुर्यवंशी यांच्या ओळखीने राहत होता संतोष - संतोष सुनिल जाधव हा विविध राज्यात सतत फिरत असल्यामुळे त्याची माहिती काढून त्याला पकडणे हे ग्रामीण पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संतोष सुनिल जाधव यास फरार कालावधीत आसरा दिल्यामुळे सौरव ऊर्फ सिध्देश ऊर्फ महाकाल हिरामण कांबळे यास अटक केलेली होती. सौरव ऊर्फ महाकाल याचेकडून माहिती काढून संतोष जाधव याला पकडण्याकरीता विविध पथक विविध राज्यात पाठविण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास संतोष सुनिल जाधव हा त्याचा मित्र नवनाथ सुरेश सुर्यवंशी, रा. स्वामी नारायण मंदिराचे समोर, मांडवी, ता मांडवी, जि. भुज, गुजरात यांचेकडे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक तात्काळ मांडवी, गुजरात येथे गेले व तेथे त्यांना नवनाथ सुर्यवंशी हा मिळून आला. त्याच्याकडे संतोष जाधव याचेबाबत विचारपूस केली असता सुरुवातीस त्याने माहिती दिली नाही. परंतु त्यास कौशल्य पूर्वकरित्या विश्वासात घेतले. तेव्हा त्याने संतोष जाधव यास मोजे नागोर, ता. मांडवी, जि. भुज, गुजरात येथे त्याचे ओळखीचे ठिकाणी ठेवले असल्याची माहिती दिली. त्याने त्याच्या राहण्याची, जेवण्याची सोय केली असल्याचे सांगितले. त्यास स्वतः चे सिमकार्ड वापरण्यास दिल्याचे सांगितले.

हेही वाचा - Pune ATS : लष्कर ए तोयबाच्या संपर्कातील आणखी एका तरुणाला पुणे एटीएसकडून अटक

हेही वाचा - Haryana Police in Pune : सौरव महाकाल आणि संतोष जाधव यांच्या चौकशीसाठी हरियाणा पोलीस पुण्यात

मध्यरात्री झोपलेल्या अवस्थेत पकडले - त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या 4 लोकांचे पथक हा फरार आरोपी संतोष सुनिल जाधव यास मोजे नागोर, ता. मांडवी, जि. भुज, गुजरात येथे पकडण्यासाठी गेलं आणि शनिवारी मध्यरात्री 2 वाजल्याच्या सुमारास हा जेव्हा टेरेसवर झोपला होता तेव्हा झोपेतच गन मस्तकावर ठेवून ताब्यात घेण्यात आले आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक हे गुजरात हा एक आठवड्यापासून तिथे होते.आणि संतोष याचा शोध घेत होते.

ओळख लपविण्यासाठी केले टक्कल - संतोष जाधव याने त्याची ओळख लपविण्याकरीता डोक्याची पुर्ण केस काढून स्वतःचा संपुर्ण पेहराव बदलेला असल्याचे दिसून आले आहे. संतोष सुनिल जाधव हा खुनासह मोक्का या गुन्ह्यात फरार असताना त्यास नवनाथ सुरेश सुर्यवंशी याने आसरा दिलेला असल्यामुळे त्यास व गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोष सुनिल जाधव यास अटक केलेली आहे. आरोपी संतोष जाधव हा आंतरराज्य टोळीतील सदस्य असल्यामुळे त्यास पोलिसांची चाहुल लागल्यास परागंधा होण्याची शक्यता होती व त्यास अटक करणे मुश्कील झाले असते. त्यामुळे पोलीस विभागाकडून संतोष जाधव याच्या अटकेची संपुर्ण मोहिम ही अतिशय गोपनीय पध्दतीने राबवून यशस्वीरित्या पार पाडली.

संतोष जाधव बिष्णोई गँगचा राज्यातील प्रमुख मोरक्या - संतोष जाधव आणि सौरभ महाकाल या दोघांनाही पंजाब गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती होती. पंजाब येथील बिष्णोई टोळीचा संतोष हा सदस्य होता. आणि मंचर येथील गुन्ह्यांनंतर बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. संतोष हा बिष्णोई टोळीचा राज्यातील प्रमुख होता. त्याच्या संपर्कात सौरभ महाकाल हा होता. अशी देखील माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

असा झाला बिष्णोई गँगशी संपर्क - बिश्नोई टोळीतील मुख्य गँगस्टार विक्रम बार याच्या संपर्कात संतोष हा होता. मंचर येथील 2019 साली पोस्को केसच्या संदर्भात जेव्हा संतोष हा बायकोला घेऊन फरार झाला आणि गुजरातला गेला. तेव्हा त्याचा संपर्क नवनाथ सूर्यवंशी यांच्याशी झाला. तेथून पुढे नवनाथ हा संतोषला मदत करू लागला. बिष्णोई गँगच्या संपर्कात संतोष हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आला. त्यांचे संपर्क देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून होत होते. संतोष हा राज्यातील बिष्णोई गँगचा प्रमुख आणि त्यानंतर संतोषच्या संपर्कात सौरभ महाकाल आणि विविध लोक होते. मंचर येथील गुन्हानंतर फरार असताना संतोष याने हरियाणा, पंजाब आणि राजस्थान येथे रेकी केली. तेथून सातत्याने संतोष हा विविध राज्यात फिरू लागला. संतोष सोशल मीडियावर विविध अकाऊंट वापरून तरुणांमध्ये आकर्षण निर्माण करत असे. आजही त्याच्या विविध सोशल मीडियावर अनेक फोलोवर्स असल्याचे सांगितले जात आहे.

ओळखीच्या लोकांच्या घरी राहत असे संतोष - गुन्हेगारी करणारी लोकं हे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य करत असतात. तिथे ते कुठेतरी किंवा ओळखीच्या लोकांचे आश्रय घेत असतात. असेच काहीस संतोष याच्या बाबतीत देखील घडल आहे. संतोष हा ज्या ज्या राज्यात फिरत होता त्या त्या राज्यात हॉटेल्समध्ये न राहता तो ओळखीच्या लोकांच्या घरी किंवा बाहेर वास्तव्य करत असे. गुजरात येथे त्याला त्याचा मित्र नवनाथ सूर्यवंशी याने वास्तव्य केले होते.

हेही वाचा - गुजरातमधील हिरे व्यवसायावर परिणाम; डायमंड युनिटमुळे कामगारांच्या कामाचे तास झाले कमी

हेही वाचा - NCB Action Bollywood Actors : एनसीबीच्या कारवाया वाढल्या; बॉलिवूड कलाकारांची रेव्हा पार्टीना मुंबईबाहेर पसंती

हेही वाचा - Legislative Council Voting : अनिल देशमुख, नवाब मलिक यांची विधान परिषदेत मतदानाच्या परवानगीसाठी उच्च न्यायालयात धाव

Last Updated : Jun 13, 2022, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.