ETV Bharat / city

पुण्यातील दुर्दैवी घटना, अपघातात वडिलांचा मृत्यू, मुलावर गुन्हा दाखल

author img

By

Published : Dec 11, 2020, 12:07 PM IST

वानवडी पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या मृत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग कुलकर्णी असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी वडिलांचे (वय 72) नाव आहे. तर याप्रकरणी संजय पांडुरंग कुलकर्णी यांच्यावर अपघातास जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

wanowrie
wanowrie

पुणे - वानवडी परिसरात भरधाव वेगात जाणारी कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. यात गाडीत बसलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या मृत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग कुलकर्णी असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी वडिलांचे (वय 72) नाव आहे. तर याप्रकरणी संजय पांडुरंग कुलकर्णी यांच्यावर अपघातास जबाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नियंत्रण सुटल्याने कार धडकली दुभाजकाला

अधिक माहिती अशी, की पांडुरंग कुलकर्णी हे मुलगा आणि सुनेसह कारने पुणे-सोलापूर रस्त्यावरून रात्रीच्या वेळी प्रवास करत होते. त्यांचा मुलगा संजय कुलकर्णी यावेळी कार चालवत होता. याचवेळी संजय याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला जाऊन धडकली. या अपघातात पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला तर सून आणि मुलगा किरकोळ जखमी झाले.

पेन्शनच्या कामानिमित्त सोलापूरला

कुलकर्णी कुटुंबीय पांडुरंग यांच्या पेन्शनच्या कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर या सर्वांना स्थानिक नागरिकांनी मदत करत रिक्षाने रुग्णालयात पोहोचले होते. तेथे पांडुरंग यांना मृत घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संजय कुलकर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अहिवळे करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.