पुणे - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज लोणावळ्यामधील नागफणी सुळक्यावर नऊवारी साडी नेसून सुमारे 40 महिलांनी ट्रेकिंग आणि रॅपलिंग करून महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. तीनशे फूट खोल नागफणी सुळका सर केल्यानंतर सुळक्यावरून रॅपलिंग करून खाली देखील उतरल्या. चढाई आणि उतरण्यासाठी अतिशय अवघड असा हा सह्याद्री पर्वत रांगांच्या कुशीत वसलेला नागफणी सुळका आहे. या अवघड सुळक्याची चढाई आणि उतरून या महिलांनी अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
हे ही वाचा - देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देण्यास वझेंचा नकार
महिलांनी घेतला थरारक अनुभव -
वर्षभर दुसऱ्यांच्या अपेक्षांची आणि कर्तव्याची ओझी उचलणारी महिला आज महिला दिनाच्या निमित्ताने का होईना. थरारक अनुभव घ्यायला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. रोजच्या दैनंदिन जीवनापेक्षा थरारक अनुभव घेऊन साजरा केलेला हा महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला आहे, असं म्हणावं लागेल.
हे ही वाचा - संपूर्ण टोळीसह कुख्यात गुंड नीलेश घायवळवर मोक्कांतर्गत कारवाई