ETV Bharat / city

Omicron In Pune : पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची एंट्री; दुबईहून परतलेल्या ७ जणांना लागण

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळून ( omicron patients found in junnar ) आल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे. या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जीनोम सिक्वेंसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा ( Omicron in Pune ) झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीयेत.

Omicron In Pune
ओमायक्रॉनचे सात रुग्ण
author img

By

Published : Dec 17, 2021, 8:07 PM IST

पुणे - कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. याचा प्रसार वेगाने होऊ शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळून ( omicron patients found in junnar ) आल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर ( Omicron in Pune ) पडली आहे.

रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीयेत -

या रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. जीनोम सिक्वेंसिंग चाचणीत त्यांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार या रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीयेत. वारूळवाडी उपकेंद्राच्या माध्यमातून १६ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या सातही रुग्णांना नारायणगाव ग्रामीण रुग्णालय येथे क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.

१५ दिवसापूर्वी आले होते दुबईवरून -

ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आढळलेले सात रुग्ण १५ दिवसापूर्वी दुबईवरून आले होते. त्यानंतर मागच्या शनिवारी त्यांचा अहवाल पुण्याच्या एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आला होता. आज त्याचा निकाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील ५० जणांचे अहवाल एनआयव्ही संस्थेत पाठवण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

हेही वाचा - Corona Variant in Mumbai : मुंबईत कोरोनाच्या ८ व्हेरियंटचे रुग्ण; जीनोम सिक्वेंसिंग चाचण्यांमधून आले समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.