ETV Bharat / city

ऑनलाईन सेक्सची ऑफर देऊन ब्लॅकमेल; पुणे पोलिसात 150 तक्रारी

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, ओळख वाढवून नंतर ऑनलाईन सेक्सची ऑफर देत ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

cyber police station
सायबर पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jun 2, 2021, 3:03 PM IST

Updated : Jun 2, 2021, 5:21 PM IST

पुणे - फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून, ओळख वाढवून नंतर ऑनलाईन सेक्सची ऑफर देत ब्लॅकमेल करण्याच्या प्रकारात मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे 150 तक्रार अर्ज आले आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी
  • पुणे पोलिसात तक्रार दाखल

कोरोनामुळे मागील काही महिन्यांपासून शहरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत आहेत. अशावेळी काम करत असताना अनेकजण मनोरंजनासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियावर काही वेळ घालवतात. अशावेळी एक अनोळखी तरुणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. त्यानंतर ओळख वाढवून त्यांच्यासोबत चॅटिंग केली जाते. विश्वास संपादन केल्यानंतर ऑनलाईन सेक्सची ऑफर देऊन संबंधित व्यक्तीला नग्न होण्यास सांगितले जाते. काही जण त्यांच्या या जाळ्यात फसतात. त्यानंतर ऑनलाईन सेक्सचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून ऑनलाईन खंडणी उकळली जाते.

हेही वाचा - दोघी मैत्रिणींचा विहिरीत बुडून मृत्यू; दिंडोरीच्या सावरपावडा येथील घटना

श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती आणि नोकरदार वर्ग अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये बळी पडतात. त्यामुळे बदनामी टाळण्यासाठी पैसे देऊन मोकळे होतात. अशा प्रकारच्या बदनामीच्या धमक्यांना कंटाळून अनेक जण जीवाचे बरेवाईट करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तर अनेकजण भीतीपोटी तक्रार दाखल करण्यासाठी पुढे येत नाहीत. यामुळेच ब्लॅकमेल करणार्‍यांचे फावते.

  • काय खबरदारी घ्यावी -

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, व्हिडिओ किंवा फोटो पाठवताना समोरील व्यक्ती विश्वासू असल्याची खात्री करून घ्यावी. त्याशिवाय ओळख नसलेल्या व्यक्तीसोबत व्हॉट्सअॅप कॉलिंग अथवा फेसबुक कॉलिंगद्वारे बोलणे टाळावे, असे आवाहन पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने केले आहे.

हेही वाचा - खेडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; मुलीनंतर कांताबाई सातारकर यांच्या नातुचंही निधन

Last Updated : Jun 2, 2021, 5:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.