पुणे - नृत्याचे आद्य दैवत नटराज, शिव, आदिशक्ती,योगी, अर्धनारी नटेश्वर, संहारक, तांडवकरी, भोळा सांब सदाशिव, अशा शिवरुपाच्या साधनेची अनुभूती ‘आदियोगी’ या पर्वातून उपस्थितांना मिळाली. मृदंगम, तालम, वीणा, बासरी,घटम आदि वाद्यांची साथसंगत, भारी भरकम अलंकार, मोगर्याच्या फुलांचा सुगंध संपुर्ण सभागृहात दरवळत वातावरण भारून गेले होते. नृत्य भक्ती फाउंडेशन संस्थेचा वर्धापन दिन आणि जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून ‘भाव प्रवाह’ या नृत्य धाराचे आयोजन फाउंडेशनतर्फे करण्यात आले होते.
निवडक आणि मनमोहक रचना - भरतनाट्यम नृत्यातील अतिशय निवडक आणि मनमोहक रचनांवर या भाव प्रवाहाचा उलगडा केला गेला. डेक्कन जिमखाना येथील सावरकर सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. अनेक सामाजिक संस्थांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. पुण्यापासून या साधनेची सुरुवात झाली असून नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत हा कार्यक्रम होणार आहे. तसेच संपूर्ण भारतात आणि भारता बाहेर ही परिक्रमा करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे शास्त्रीय नृत्यांगना सई परांजपे म्हणाल्या.
नृत्य भक्ती फाउंडेशन वर्धापन दिन, 'भाव प्रवाह’ नृत्य धारेतून उलगडली शिवाची रुपे - पुणे भाव प्रवाह नृत्य धारेतून उलगडली शिवाची रुपे
भरतनाट्यम नृत्यातील अतिशय निवडक आणि मनमोहक रचनांवर या भाव प्रवाहाचा उलगडा केला गेला. डेक्कन जिमखाना येथील सावरकर सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. अनेक सामाजिक संस्थांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे. पुण्यापासून या साधनेची सुरुवात झाली असून नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत हा कार्यक्रम होणार आहे. तसेच संपूर्ण भारतात आणि भारता बाहेर ही परिक्रमा करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे शास्त्रीय नृत्यांगना सई परांजपे म्हणाल्या.