पुणे गणेशोत्सव मंडळांना Ganeshotsav Mandal In Pune परवानगीसाठी पुणे पोलिसांकडून पोलिस ठाण्याअंतर्गत एक खिडकी योजना सुरु करण्यात आली आहे. मंडळांचे अर्ज आल्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, वाहतुक शाखा व विशेष शाखेच्या पोलिसांकडून Pune Transport Branch मंडळाच्या जागेची पाहणी करुन, कागदपत्रांची तपासणी करुन एक तासातच परवानी दिली जात आहे. आत्तापर्यंत पोलिसांकडे अकराशे अर्ज आले असून त्यापैकी एक हजार मंडळांना तत्काळ परवानगी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका, अशा सुचना पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार, पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना सहकार्याची भुमिका घेण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रमुख गणेशोत्सव मंडळे, मानाचे गणेशोत्सव मंडळांसह महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, शांतता कमिटी सदस्य व पुणे पोलिस विघ्नहर्ता न्यासाच्या सदस्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह परिमंडळन निहाय पोलिस उपायुक्त, वाहतुक शाखा व विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्यासमवेत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. कर्णिक यांनी परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांच्यासमवेत परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची बैठक सोमवारी घेतली.
गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये एक खिडकी योजना' सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक पोलिस ठाण्याचे दोन पोलिस, वाहतुक शाखेचे एक व विशेष शाखेचे एक पोलिस अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या परवानगी अर्जाची दखल घेतात. प्रत्यक्षात मंडळांची पाहणी, त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पाहणी करुन त्यांना परवानगी दिली जात आहे. विशेष शाखेकडे आत्तापर्यंत अकराशे अर्ज आले आहेत. त्यापैकी एक हजार अर्जांना परवानगी दिली असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली. गणेशोत्सव मंडळांसाठी एक खिडकी योजना सुरु केली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या अर्जांची पाहणी करुन परवानगी देत आहेत. परवानगी देण्याबरोबरच वाहतुक व गर्दीची ठिकाणे निवडून त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरु आहे.
हेही वाचा Ganeshotsav 2022 प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यामुळे पर्यावरणाला धोका होऊ शकतो, मूर्तिकार लखन सोनुले