पुणे - कोरोना महामारीमध्ये कधीकाळी पुणे हे हॉटस्पॉट ठरले होते. आता देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पुण्यातही कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. विशेष म्हणजे, आज(20 ऑक्टोबर) पुण्यात एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही. ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे.
-
पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
">पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.पुण्यात आज एकही कोरोनाबाधित मृत्युची नोंद नाही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 20, 2021
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना आता मृत्युसंख्येवरही नियंत्रण प्राप्त झालेले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय.
- दिवसभरात 112 कीरोनाबाधित रुग्ण -
ऑगस्ट महिन्यामध्ये तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्यात पुणे शहरात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेला थोपवण्यात प्रशासनाला यश आले असेच दिसत आहे. पुणे शहरात आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे, तर दिवसभरात 112 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक म्हणजे पुण्यात उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजारांच्या खाली देखील आली आहे.
हेही वाचा - Cruise Drug Case : जामिनासाठी आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी
पुणे मनपा हद्दीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आला असताना, आता मृत्यू संख्येवरही नियंत्रण प्राप्त झाले आहे. आज तर महापालिका हद्दीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. ६ फेब्रुवारी २०२१ नंतर हा दिलासा आपल्याला पहिल्यांदाच मिळालाय. असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
- लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा लवकरच होणार पार -
दरम्यान, देशात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरोधात लढाई सुरू आहे. यात लसीकरण हे कोरोना महामारीविरोधात मोठे शस्त्र ठरले आहे. या मोहिमेत देश लवकरच एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. पुढील काही दिवसात देशात कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या 100 कोटींचा आकडा पार करणार आहे.
हेही वाचा - Aryan Khan Bail Rejected : दिलासा नाहीच, आर्यन खानचा जामीन न्यायालयाने फेटाळला