ETV Bharat / city

Ajit Pawar on Kirit Somaiya : किरीट सोमैयांच्या आरोपावर अजित पवारांचे उत्तर, म्हणाले... - अजित पवार कोविड सेंटर घोटाळा

किरीट सोमैया यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी कोविड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण दिले ( Ajit Pawar On Kirit Somaiya Allegation ) आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar
author img

By

Published : Feb 12, 2022, 5:16 PM IST

पुणे - भाजपा नेते किरीट सोमैया यांनी जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले ( Ajit Pawar On Kirit Somaiya Allegation ) आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले ( Ajit Pawar On Kovid Care Center ) आहे.

कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जम्बो कोविड सेंटरमध्ये राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि महापालिकेचा सहभाग असतो. त्यामध्ये कोणताही राजकीय कार्यकर्ता किंवा नेत्याचा सहभाग नव्हता. मी सर्वांना सांगितले होते की यात पारदर्शीपणा ठेवा. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असेही पवार म्हणाले.

अजित पवार प्रसारमाध्यमांना संवाद साधताना

शिवनेरीवर मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवनेरीवर उपस्थित राहणार नाहीत. तब्येतीच्या कारणास्तव ते शिवनेरीवर उपस्थित राहणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली आहे.

हेही वाचा -Goa Assembly 2022 : 'घोडेबाजारात घोडे विकले जातात, शिवसेनेचे वाघ...,' आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.