पुणे - जगभरात अनेक धर्मियांच्या नव वर्षाची ( New Year in Islam ) सुरवात ही जल्लोषात, आनंदात होत असते, पण इस्लाम धर्मात नवीन वर्षाची सुरवात ही दुःखाने होते. यामागील कारण खूप मोठे आहे. आज याबाबत आपण ( Muharram history and significance ) जाणून घेऊया.
हेही वाचा - Avinash Bhosale : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टर सीबीआयकडून जप्त
मोहरम हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमान हुसैन हे करबला येथे आपल्या 72 अनुयायींबरोबर शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मुस्लीम बांधव हा महिना शोक म्हणून व्यक्त करतात. उद्यापासून सर्वत्र मोहरमला सुरुवात होणार आहे. इस्लामिक कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये फरक असल्याने दर वर्षी मोहरमची तारीख बदलते. इस्लामिक कॅलेंडरमध्ये चंद्राला आधार मानून तारखा आणि तिथी निश्चित केल्या जातात.
काय झाले होत या महिन्यात - हजरत मोहम्मद पैगंबर यांचे जवाई हजरत आली यांचे पुत्र हजरत इमाम हुसैन हे मोहरम महिन्याच्या 10 तारखेला म्हणजेच रोजे आशुरला करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात 'तारीख-ए-इस्लाम ' चे ऐतिहासिक युद्ध झाल होते. हे युद्ध सत्य आणि अस्त्याची लढाई होती. त्या काळी यजीद एक क्रूर शासक होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. यजीदला इस्लाम धर्म हा मोहम्मद पैगंबर म्हणजेच अल्लाह च्या आदेशानुसार जो इस्लाम धर्म चालला होता तो मान्य नव्हता. तो इस्लाममध्ये त्याच्या आवडीनुसार नियम तयार करून तो म्हणेल तेच शासक असा इस्लाम धर्म त्याला बनवायचा होता. पण त्यावेळी मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी त्याला विरोध केला. आणि त्यानंतर या क्रूर शासक यजीदने एक तर माझे शासन मान्य करा, अन्यथा युद्ध करा, असा फरमान त्याने काढला. तेव्हा हजरत हुसैन यांनी त्याचा तो फरमान रद्द करून युद्ध पत्करले.
आशुरा म्हणजे काय? - इस्लाम धर्माच्या पहिल्या महिन्यात मोहरमच्या 10 तारखेला ( 10 मुहर्रम 61 हिजरी, अर्थात 10 ऑक्टोबर, 680 इ.स ) मोहम्मद साहेब यांचे नातू हजरत हुसैन यांना करबला येथे यजीद बिन मुआविया यांच्या एक लाख साथिदारानी इमाम हुसैन यांच्या अनुयायींना 3 दिवस विना पाण्याचे ठेवून शहीद केले. म्हणून या दिवशी 'यौमे आशुरा' म्हणून सर्वत्र दुःख (शोक) केला जातो. इमाम हुसैन यांच्या बरोबर जे लोक होते त्यात महिला-पुरुष व मुलांचा समावेश होता. हजरत हुसैन यांच्या फौजेमध्ये अनेक लहान मुले होती. यावेळी इमाम हुसैन यांच्या बरोबर त्यांचे 6 महिन्यांचे बाळ अली असगर हे देखील होते आणि त्यावेळी ते देखील 3 दिवस विना पाण्याचे होते. अशा परिस्थितीही ते युद्धास सामोरे गेले. अब्बास इब्ने अली हे हजरत हुसैन यांच्या सैन्याचे प्रमुख होते. शेवटच्या क्षणापर्यंत इमाम हुसैन यांनी आजोबा मोहम्मद पैगंबर यांची शिकवण आणि त्यांचा इस्लाम हाच खरा इस्लाम आहे हे सांगितल. पण, क्रूर याजीदच्या सैन्याने इमाम हुसैन यांची कोणतीही गोष्ट न ऐकता त्यांना शहीद केले. याची आठवण म्हणून सर्वत्र मोहरम साजरा केला जातो.
ठिकठिकाणी काढले जातात जुलूस - मोहरम हा आनंदाचा सण नसून दु:खाचा दिवस आहे. या महिन्यात इमाम हुसैन यांचे बलिदान उजागर केले जाते. शिया मुस्लीम समुदायातील लोक काळे कपडे घालून या बलिदानासाठी जुलूस काढतात. आणि इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतात. भारतात ठिकठिकाणी या महिन्यात जेव्हा जेव्हा जुलूस काढला जातो तेव्हा तेव्हा सर्वधर्मीय नागरिक या जुलूसचे स्वागत करून अलम (पंजा) आणि ताबूत घेऊन जे लोक उभे असतात त्यांच्या पायावर पाणी टाकून आंदरांजली व्यक्त करतात.
हेही वाचा - आकाडीच्या पार्टीत व्यसन करू नको म्हणून सांगणाऱ्या मित्राचा ९ जणांकडून खून, १ जण गंभीर