ETV Bharat / city

Traffic Rules Pune : पुण्यात आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर होणार कडक कारवाई; दंडाचा सुधारित आदेश जारी - हेल्मेट न वापरणाऱ्यांवर होणार कारवाई पुणे

मोठा फटका पुणेकरांना बसणार आहे. कारण हेल्मेट न वापरणाऱ्या ( Action Against Non-Helmet Wearers ) वाहनचालकांना पहिल्या गुन्ह्यात पाचशे रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यात पंधराशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणाऱ्याची सर्वाधिक संख्या पुण्यात ( Pune Traffic Branch ) आहे. हो हे खर आहे आणि अशाच या हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात नोटीस देखील आल्या आहे.

पुणे वाहतूक
पुणे वाहतूक
author img

By

Published : Dec 17, 2021, 8:51 PM IST

Updated : Dec 17, 2021, 9:10 PM IST

पुणे - राज्यातील वाहतूक शाखेच्या अतिरिक्‍त पोलीस महासंचालकांनी ( Additional Director General of Police Traffic Branch ) नवीन दंडाच्या अंमलबजावणीसाठी सुधारित आदेश काढला आहे. त्यानुसार वाहतूक मोडल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाचे रक्कम वाढवण्यात आले आहेत. त्याचा मोठा फटका पुणेकरांना बसणार आहे. कारण हेल्मेट न वापरणाऱ्या ( Action Against Non-Helmet Wearers ) वाहन चालकांना पहिल्या गुन्ह्यात पाचशे रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यात पंधराशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे. हेल्मेट न वापरणाऱ्याची सर्वाधिक संख्या पुण्यात ( Pune Traffic Branch ) आहे. हो हे खर आहे आणि अशाच या हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात नोटीस देखील आल्या आहे.

विविध प्रतिक्रिया आणि वाहतूक सुधारित आदेशाचा आढावा
  • भाजपाचा देखील हेल्मेट सक्तीला विरोध

पुण्यात यंदाच्या वर्षात हेल्मेट कारवायांच्या 18 ते 20 लाख केस आहे. त्यामुळे हेल्मेट कारवाईच्या दंडाच्या वाढीव रकमेचा पुणेकरांना मोठा फटका बसणार आहे. अशा पद्धतीने करण्यात येणाऱ्या हेल्मेट सक्तीचा भारतीय जनता पक्षाकडून आम्ही विरोध करत असून नजीकच्या काळात या विरोधात रस्त्यावर देखील उतरु असे यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच ही कारवाई ज्या खात्याकडून होत आहे. त्या खात्यातील मंत्री नितीन गडकरी यांच्याशी देखील यासंदर्भात आम्ही चर्चा करू, असे देखील यावेळी पाटील म्हणाले.

  • 'नागरिकांनी नियमांचे पालन कराव'

वाहतूक नियमभंगाच्या विविध गुन्ह्यांसाठी किमान दंड 200 रुपयांवरून 500 रुपये करण्यात आला आहे. त्यामध्ये हेल्मेट न वापरण्याच्या पहिल्या गुन्ह्यासाठी 500 रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी 1500 रुपये दंड द्यावा लागेल. तसेच परवाना संपूनही वाहन चालवल्या प्रकरणी आधीच्या दंडात दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. आता तो 5000 करण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, जेणे करून सर्वांना शिस्त लागेल, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.

  • हेल्मेट विरोधी कृती समितीचा विरोध

अतिरिक्त पोलीस महासंचालक कार्यालयाचे अधिसूचनेत पोलिसांचा आदेश नाकारणाऱ्यांना 200 रुपये ऐवजी 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. पोलिसांचा आदेश नाकारणे या प्रकारात नो एंट्री सिग्नलचे पालन न करणे, एकेरी मार्गातून विरुद्ध दिशेने जाणे, दुचाकीवर ट्रिपल सीट जाणे आदी प्रकारांच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये पहिल्या गुन्ह्यासाठी पाचशे रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी पंधराशे रुपये दंड द्यावा लागणार आहे. हे सर्व नियम मान्य असले तरी हेल्मेट सक्तीचा नियम मात्र पुणेकरांना मान्य नाही. याचा निषेध करत सर्वपक्षीय सदस्यांकडून हेल्मेट विरोधी कृती समिती तयार करण्यात आली आणि या समितीने देखील या हेल्मेट सक्तीचा विरोध केला आहे.

  • सर्वसामान्य नागरिकांना बसतोय फटका

सर्वपक्षीयांकडून विरोध जरी होत असला तरी हे नियम कोणाच्या ना कोणाच्या सत्तेच्या काळातच बनवले गेले आहे. याचे श्रेय न घेता फक्त विरोध म्हणून पुणेकरांच्यासमोर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप राजकीय पक्षांकडून होत आहे. या हेल्मेट सक्तीचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसत आहे.

हेही वाचा - E-Chalan Outstanding : न्यायालयाचा नोटीसीनंतरही राज्यात १ कोटीच्यावर ई-चलान थकीत!

Last Updated : Dec 17, 2021, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.