पुणे- शहरात कोरोनाच्या संख्येने नवा उच्चांक गाठला आहे. दिवसभरात आज 7 हजार 10 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 4, 099 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे शहरात कोरोनाबाधीत 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधी 16 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर सध्या 999 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 48 हजार 939 इतकी झाली आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3 लाख 12 हजार 382 आहे. आज 23 हजार 595 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. पुणे जिल्ह्यात गुरुवारी एका दिवसात 12 हजार90 नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्हाभरात 21 हजार 426 रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. तर 68 हजार 172 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
हेही वाचा-कोरोनावाढीचा वेग कमी करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील - पालिका आयुक्त
लशींचा जिल्ह्यात तुटवडा-
पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. एकीकडे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना शहरात लसीकरण वेगाने व्हावे, अशी मागणी होत आहे. मात्र, लसीअभावी नागरिकांना लस केंद्रावरून लस न घेता माघारी जावे लागले, तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद होती.
राज्यात कोरोनाची स्थिती भयावह-
गेल्या 24 तासांत राज्यात 56 हजार 286 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यावरून राज्यातील कोरोनाच्या भयावह परिस्थितीचा अंदाज येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज 376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.77 टक्क्यांवर पोहोचला आहे.
हेही वाचा-'एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलव्यात, विद्यार्थ्यांची सरकारकडे मागणी