पुणे - शहरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना खासगी आणि महापालिकेच्या तसेच सरकारी रुग्णालयात खाटांची उपलब्धता हा कळीचा मुद्दा ठरत आहे. शहरात सध्या 725 अत्यवस्थ रुग्ण आहेत. तर 3016 रुग्ण ऑक्सिजन प्रणालीवर आहेत. पुणे शहरात आजपर्यंत 5 हजार 270 मृत्यू झालेले आहेत. शहरातील रुग्णालयात सध्या 15 हजार 381 खाट कोरोना रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहेत. यातील 3 हजार 779 बेड सध्या उपलब्ध आहेत.
जम्बो केंद्रामध्ये केवळ 65 खाट शिल्लक
शहरातील रुग्णालयांमध्ये एकूण खाटांपैकी सध्या व्हेंटिलेटर नसलेले 360 अतिदक्षता खाट शिल्लक आहेत आणि व्हेंटिलेटर असलेले 159 अतिदक्षता खाट शिल्लक आहेत. दुसरीकडे शिवाजीनगरच्या जम्बो कोरोना केंद्राचा विचार केला तर येथे एकूण 425 खाट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ऑक्सिजन विरहित आयसोलेशन खाटांची संख्या 75 इतकी आहे. ऑक्सिजन खाटांची संख्या 300 आहे. व्हेंटिलेटर नसलेले अतिदक्षता खाट 15 आहेत तर व्हेंटिलेटर असलेले अतिदक्षता खाट 35 आहेत. यातील व्हेंटिलेटर नसलेले अतिदक्षता खाट आणि व्हेंटिलेटर असलेले अतिदक्षता खाट भरले असून 50 पैकी एकही खाट शिल्लक नाही. तर 300 ऑक्सिजन खाटांपैकी सध्या 50 खाट शिल्लक आहेत आणि ऑक्सिजन विरहित अलगीकरणाचे 15 खाट शिल्लक आहेत.