पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आप्पा जाधव यांना 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याची घटना समोर आली ( Ncp Worker Appa Jadhav Beaten ) आहे. तसेच, या टोळक्यातील काही जणांनी जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड ही केली आहे. पुण्यातील नारायण पेठेत आज ( 25 मे ) संध्याकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण? - आप्पा जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. जाधव यांचे भिडे पुलाकडून नारायण पेठेत येणाऱ्या चौकात हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. जाधव हे त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बुधवारी ( 25 मे ) सायंकाळी कार्यकर्त्यांमध्ये बसले होते. तेव्हा संतोष कांबळे हा त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या कार्यालयासमोर आला. तेव्हा जाधव यांना टोळक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणती जाधव यांना जबर दुखापत झाली आहे.
त्यानंतर देखील टोळक्याने जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड करत मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर कांबळे आणि त्याचे साथीदार दुचाकीवरुन पळून गेले. याप्रकरणी आप्पा जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात कांबळे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जाधव यांनी एकास केली होती मारहाण - आप्पा जाधव यांनी काही दिवसांपूर्वी विनायक आंबेकर या व्यक्तीस मारहाण केली होती. तदनंतर आता आप्पा जाधव यांच्या कार्यालयात त्यांना मारहाण केली आहे. तसेच, त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
हेही वाचा - Yasin Malik : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी यासिन मलिकला जन्मठेप; वाचा, काय आहे प्रकरण?