ETV Bharat / city

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक : "चंद्रकांत दादांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे" - पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020

नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारने विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलंय. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे.

jayant patil on chandrakant patil
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक : "चंद्रकांत दादांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे"
author img

By

Published : Dec 4, 2020, 1:28 PM IST

पुणे - विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारने विजय मिळवला. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाला सामोरं जावं लागलंय. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या शैलीत भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडलं आहे. राज्यातील एकाही पदवीधर मतदारसंघात भाजपाला यश संपादन करता आले नाही.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूक : "चंद्रकांत दादांनी मोठ्या मनाने पराभव स्वीकारला पाहिजे"
आता भाजपला भविष्यात 10 वेळा विचार करावं लागेलविधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेल मतदान बघितलं, तर भारतीय जनता पक्षाला भविष्यात 10 वेळा विचार करावं लागेल, असे जयंत पाटील म्हणाले.

जनता महाविकास आघाडीच्या पाठिशी

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. त्यावर जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल पाहता जनता महाविकास आघाडी सरकारच्या पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपला पुढचे अनेक वर्ष तीन पक्षाची सरकार सहन करावं लागेल

पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी तिन्ही पक्षांनी एकत्र लढावं, असं म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रत्युत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांचे स्वप्न तूर्तास तरी आम्ही पूर्ण करू शकणार नाही. पुढची अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाला 3 पक्षांच्या या सरकारला सहन करावे लागणार आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

हे यश कार्यकर्त्यांचं

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्यामुळे या निवडणुकीत सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकारला पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळण्यामागे कार्यकर्त्यांचे कष्ट आहेत, असे पाटील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.