पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना भाजप खासदार गिरीश बापट आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकूश काकडे यांच्या मैत्रीवरून जोरदार टोलेबाजी केली. मंचावर पवार आणि गिरीष बापट यांच्यात एक प्रकारची जुगलबंदी पाहायला मिळाली.
काय म्हणाले शरद पवार - गिरीश बापट आणि अंकूश काकडेंची महानगरपालिकेतील मैत्री सर्वांना माहीत आहे. तेव्हा पुण्यातील अनेक जागा आम्ही जिंकल्या होत्या. पण एक गोष्ट माझ्या लक्षात याची नाही की गिरीश बापट जिथे उभे राहतात तिथून निवडून कसे येतात? असा सवाल करतानाच एकदा कसब्यात की कुठे तरी बापट उभे होते. कसब्यात उभे असताना आम्ही ठरवलं की आता काळजी घेऊया बापटांची. पण आम्हाला त्यात काही यश आले नाही. आता मात्र हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं,असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगवला. पुण्यात अंकुश काकडे लिखित ' हॅशटॅग पुणे' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. याच कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मिश्किल फटके बाजी केली आहे.
तर बापट म्हणतात कोश्यारी असेपर्यंत काकडेंना विधानपरिषद नको - दुसऱ्या बाजूला भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी देखील अंकुश काकडे यांची फिरकी घेताना चक्क शरद पवारांनाच इशारा दिला आहे. मी बापट असलो तरी काकडे पोपट आहे, असं म्हणत बापट यांनी तुम्ही काकडेंना काहीही द्या. पण भगतसिंह कोश्यारी राज्यपाल आहेत. तोपर्यंत त्यांना विधान परिषद देऊ नका, असा टोला लागवला आहे. तसेच पुण्यातील गणेशोत्सवात रात्रभर भोंग्यांचा त्रास होतो, असे सांगतानाच त्या भोंग्याचा आणि या भोंग्याचा काहीच संबंध नाही, अशी मिश्किल टिप्पणीही बापट यांनी केली आहे.
गिरीश बापट निवडून कसे येतात? पुण्यात रंगली शरद पवार अन् गिरीश बापट यांच्यात जुगलबंदी - पुणे शरद पवार बातमी
गिरीश बापट आणि अंकूश काकडेंची महानगरपालिकेतील मैत्री सर्वांना माहीत आहे. तेव्हा पुण्यातील अनेक जागा आम्ही जिंकल्या होत्या. पण एक गोष्ट माझ्या लक्षात याची नाही की गिरीश बापट जिथे उभे राहतात तिथून निवडून कसे येतात? असा सवाल करतानाच एकदा कसब्यात की कुठे तरी बापट उभे होते. कसब्यात उभे असताना आम्ही ठरवलं की आता काळजी घेऊया बापटांची. पण आम्हाला त्यात काही यश आले नाही. आता मात्र हे पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं,असा मिश्किल टोला शरद पवार यांनी लगवला.