पुणे - अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट केली ( Ketaki Chitale Controversy Post On Sharad Pawar ) आहे. त्यानंतर तिच्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. याप्रकरणी केतकी विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली ( Rupali Patil Thombare Criticized Ketaki Chitale ) आहे.
'कोण केतकी चितळे, तीच वय काय?' - 'ईटिव्ही भारत'शी बोलताना रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या की, कोण केतकी चितळे, तीच वय काय? ती तिच्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माणसाला, अशी भाषा वापरते. एकत्र ही मनोरुग्णाने गंजाडी अभिनेत्री आहे. जातीय तेढ वाढवण्याचा जो प्रयत्न आहे. तो कोणत्या लेव्हलपासून कुठल्या लेव्हल पर्यंत सतत बिंबवण्याचे हे जे पोरखेळ चालू आहेत ना, त्वरित बंद झाले पाहिजे.
'तिच्यावर मानसिकतेचे उपचार सुरू' - मुळात केतकीच तेवढे वय सुद्धा नाही की तिने शरद पवारांवर वक्तव्य करावे. केतकी चितळे आजारी असून, तिच्यावर मानसिकतेचे उपचार सुरू आहे. तिच्या आईवडिलांचे दुर्देव म्हणावे लागेल की तिला त्यांनी संस्कार दिलेले नाहीत. तिने पोस्ट करताना कुणी तरी वकील नितीन भावे याच नाव खाली लिहिले आहे. मला नाही वाटत कुणी नितीन भावे वगैरे असतील, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
'तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार' - परंतु, केतकीने हा जो काही खोडसाळ पणा केला आहे. तिला तिच्याच भाषेत, तिच्याच संस्कारात चांगला चोप देण्यात येणार आहे. पहिली गोष्ट शरद पवार यांच्याबद्दल बोलण्याची तिची पात्रता नाही. ती जे काही बोललेही आहे, तिला कोणाताही अर्थ नाही. मात्र, त्यामुळे आमच्या सारख्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याच्याबद्दल तिला चांगल्या चार पाच चापटी मिळाल्या ना, ती तिच्या आजारातून लवकर बरी होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.
'छडी वाजे छम छम' - तिचा नंबर आम्ही फेसबुकला टाकणार आहोत. ती जे काही बोलली आहे, वाईट साईट त्याच्या अत्यंत खालच्या दर्जात तिला कमेंट करायला सांगणार आहोत. तिच्यावर बदनामी केली म्हणून 504 अंतर्गत गुन्हा दाखल होतो. गुन्हा दाखल करून, असे विकृत जागेवर येत नसतात. केतकी सारखे तर नाहीच नाही. तिने आता कळसच गाठला आहे. छडी वाजे छम छम या उक्ती प्रमाणे तिला छड्या दिल्या की, ती जागेवर येईल आणि तिचे संस्कारही जागेवर येतील, असे सुद्धा रुपाली पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut : आमचा बुस्टर नाही तर, मास्टर-ब्लास्टर डोस असतो; राऊतांचा भाजपला टोला