पुणे: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाचे वाटप करण्यात आले. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 6 जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. यावरून अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला एक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळताना नाकीनऊ आले होते. ते 6 जिल्ह्यांना कसे न्याय देऊ शकतील, असे वक्तव्य केले होते. यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उत्तर देत मी अजित पवार यांना गुरूमंत्री देणार असल्याचे सांगितले आहे. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
अजित पवार यांनी उत्तर दिले मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून विचारणार आहे की, मी तुमच्याकडे ट्रेनिंगला कधीपासून येऊ, त्यासाठी किती फी लागेल ? फडणवीस मला ही ट्रेनिंग मोफत देणार आहेत का ? त्यांच्याकडे जाऊन मी माझ्या ज्ञानात भर घालतो, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (leader of opposition ajit pawar) यांनी मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे असे म्हटले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister devendra fadnavis) यांनी त्यांना उत्तर देताना, एवढी तसदी घेण्याची गरज नाही मी तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण देईल, असा टोला लगावला आहे. अजितदादा ज्या पद्धतीने पाच ते सहा कारखान्यांचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने मला सुद्धा सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो असेही फडणवीस म्हणाले.