ETV Bharat / city

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते येणार अडचणीत, पुण्यात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी - Mumbai High Court

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ( NCP Complaint Against Gunratna Sadavarte ) पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ( Shivaji Nagar Police Station Pune ) अर्ज देण्यात आला आहे. मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ( Controversial Statement Against Maratha Community ) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जाद्वारे करण्यात आली ( File Case Against Gunratna Sadavarte ) आहे.

Gunratna Sadavarte
गुणरत्न सदावर्ते
author img

By

Published : Apr 21, 2022, 7:57 PM IST

पुणे : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आधी मुंबईत अटक झाल्यानंतर नंतर सातारा आणि आता कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुणरत्न सदावर्ते यांना आता पुण्यात देखील मोठा झटका बसणार असल्याचं समोर येत आहे. कारण पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ( NCP Complaint Against Gunratna Sadavarte ) शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये ( Shivaji Nagar Police Station Pune ) गुणरत्ने सदावर्ते व जयश्री पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून एक अर्ज देण्यात आला आहे. मराठा समाजाविषयी आक्षपार्ह विधान ( Controversial Statement Against Maratha Community ) केल्याबद्दल सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल ( File Case Against Gunratna Sadavarte ) करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.

सदावर्ते यांनी जातीय तेढ निर्माण केला, राष्ट्रवादीचा आरोप : जयश्री पाटील व गुणरत्ने सदावर्ते यांनी युट्युब चॅनलवर मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली व कुठून आले यावर आक्षेपार्ह विधान केले होते. यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे. या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असं पत्र राष्ट्रवादी कॉग्रेसने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिले आहे.

गुणरत्न सदावर्ते येणार अडचणीत, पुण्यात गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी

काय म्हणाले होते सदावर्ते : गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली याबाबतीत एक आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानात गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या जन्माबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्याचबरोबर सदावर्ते यांनी मराठा समाजाची चुकीची वंशावळी देखील सांगितली होती. हा समाज फक्त थोतांड मांडून आरक्षण घेण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीका देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती.

हेही वाचा : Gunratna Sadavarte Police Custody : गुणरत्न सदावर्तेंना 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.