ETV Bharat / city

महागाईचा विरोध : राष्ट्रवादीने गॅस सिलिंडरचे घातले श्राद्ध, वापरणार चुली - राष्ट्रवादी आंदोलन बातमी

उज्ज्वला गॅस योजनेद्वारे सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. ५ कोटी महिलांपर्यंत ती पोहोचली की नाही संशोधनाचा विषय आहे. पण या योजनेने महिलांच्या डोळ्यात धूर आला आहे, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर
author img

By

Published : Oct 8, 2021, 3:05 PM IST

Updated : Oct 8, 2021, 3:16 PM IST

पुणे - पुणेकरांना, घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा पुन्हा एकदा झटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यात सतत होणाऱ्या दरवाढीने सुमारे १०० रुपयांनी महागला आहे. गेल्या वर्षभराची तुलना करावयाची झाल्यास, सिलिंडरच्या दरात तब्बल २९१ रुपयांची वाढ झाली आहे. यानुसार गॅसदरात दरमहा सरासरी प्रति सिलिंडर २४ रुपये २५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या वाढलेल्या गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गॅस सिलिंडरला श्राद्ध घालत अनोखे आंदोलन करण्यात आले आहे.

हेही वाचा - महागाईविरोधात काँग्रेसकडून एक कोटी राज्यव्यापी स्वाक्षरी मोहीमेला सुरुवात

'आत्ता आम्ही चुली वापरणार'

गॅस सिलिंडरच्या दारात पुन्हा एकदा काल १५ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यातील ही दुसरी वाढ आहे. मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून त्यांनी फक्त महागाई वाढवली आहे. सर्वसामान्य जनतेचे आर्थिक नियोजन हे कोलमडले आहे. कोरोनाच्या या काळात लोकांचे रोजगार गेले आहेत. ज्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत त्यांचे व्यवसाय हे डबघाईला आले आहेत. अशा परिस्थितीत महागाई वाढली आहे. ही दरवाढ ऐतिहासिक आहे. म्हणून आज आम्ही या गॅस सिलिंडरचे श्राद्ध घातले आहे. त्याची शांती केली आहे आणि आत्ता आम्ही चुली वापरता आहोत. उज्ज्वला गॅस योजनेद्वारे सरकारने महिलांची फसवणूक केली आहे. ५ कोटी महिलांपर्यंत ती पोहोचली की नाही संशोधनाचा विषय आहे. पण या योजनेने महिलांच्या डोळ्यात धूर आला आहे, अशी टीका यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

हेही वाचा - gas price hike : रस्त्यावर चूल मांडत राष्ट्रवादी काँग्रेसने थापल्या भाकरी

'जिवंतपणे श्राद्ध घालण्याची वेळ'

मागील सात वर्षात टप्प्याटप्याने सुरू असलेली महागाईचा आज कडेलोट होण्याची वेळ आली आहे. सामान्य जनतेने जिवंतपणे श्राद्ध घालावे, अशी परिस्थिती मोदी सरकारच्या कृपेने आली आहे. सर्वसामान्य जनतेला ३०० रुपयांचे मिळणारे सिलिंडर आज १००० रुपयांवर गेला आहे, अशी टीका शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोदी सरकारवर केली आहे.

Last Updated : Oct 8, 2021, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.