पुणे - आज केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्मृती इराणी यांच्या दौऱ्याला विरोथ करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यातील जे डब्ल्यु मॅरेट येथे स्मृती इराणी यांचा कार्यक्रम सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसने हॉटेलच्या बाहेर गोंधळ घातला.
पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडण्यास सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी नंतर आंदोलनकांनी स्मृती इराणी यांच्या कार्यक्रम स्थळी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी स्मृती इराणी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.