पुणे - किरीट सोमैया आणि नारायण राणे यांना किती महत्वाचे द्यायचे ते आपण ठरवावे, असे वक्तव्य राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुण्यात बोलताना केले आहे.
हेही वाचा - VIDEO : पुण्यातील लाल महाल येथे शिवजन्मोत्सव साजरा
पुण्यातील येरवडा येथील चिमा उद्यानमध्ये उभारण्यात आलेल्या राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे, शिवसेना नेते सचिन अहिर, शिवसेना नेते आदित्य शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली.
..याचा निर्णय आत्ताच घेता येणार नाही
येत्या काही दिवसांत पुणे महापालिका निवडणूक आहे. या निवडणुकीत आघाडी होणार का? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. राज्यात महविकास आघाडीची सरकार आहे, त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्र लढवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच पुण्यात आदित्य ठाकरे यांनी आज बोलताना महापालिका निवडणुकीत शिवसेनेची ताकद दिसेल, असे सांगत महापालिका निवडणूक एकट्याने लढायची की, आघाडी करायची याबाबत महत्वाचे नेते सांगतील, असे विधान केले.
हेही वाचा - पहाडी आवाजात शिवगर्जना देऊन खासदार अमोल कोल्हे यांनी शिवरायांना दिली मानवंदना