ETV Bharat / city

Nana Patekar On Amol Kolhe : "भूतकाळ मानगुटीवर बसत असेल तर..." अमोल कोल्हे प्रकरणावर नाना पाटेकर स्पष्टच बोलले - नाना पाटेकर मराठी बातमी

अमोल कोल्हे हे नट आहेत, त्यांनी कोणती भूमिका करावी हा त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे, असे ठाम मत नाना पाटेकर यांनी व्यक्त ( Nana Patekar On Amol Kolhe ) केले. तसेच, लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला.

Nana Patekar
Nana Patekar
author img

By

Published : Jan 23, 2022, 4:24 AM IST

पुणे - अमोल कोल्हे हे एक नट आहेत आणि त्यांनी कोणती भूमिका करावी हा सर्वस्वी त्यांचा व्यक्तीगत प्रश्न आहे. मात्र, महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हा इतिहास आहे. भूतकाळ जर मानगुटीवर बसत असेल, तर त्याबद्दल विचार न केलेलाच बरा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त ( Nana Patekar On Amol Kolhe ) केले. लोकांच्या भावना आजकाल सारख्याच दुखावल्या जातात, असा टोलाही त्यांनी लगावला. ते पुण्यात बोलत ( Nana Patekar In Pune )होते.

नाना पाटेकर म्हणाले की, "आपल्याला भारतरत्न हे जयंती पुण्यतिथीलाच आठवतात. आपण केवळ त्यांचे चबुतरे उभे केले आहेत. पण, त्या चबुतऱ्यांखाली गाडलेले त्यांचे विचार पुन्हा बाहेर काढले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न धोंडे केशव कर्वे यांनी केलेले काम नतमस्तक होण्यासारखंच आहे. असे समाजकार्य करण्यासाठी भूकच असावी लागते."

ज्या व्यक्तीरेखा मला आवडल्या नाहीत त्या मी केल्या नाही

"ज्या व्यक्तीरेखा मला आवडल्या नाहीत त्या मी केल्या नाहीत, त्या केल्या असत्या तर झोप लागली नसती. तळमळत राहिलो असतो. खलनायकाच्या भूमिका करताना त्या संपूर्ण व्यक्तीरेखातून जावे लागते, त्याचा त्रास होतो. माफीचा साक्षीदार चित्रपटातील जक्कल साकारताना मलाही त्रास झाला. ही भूमिका केल्याचा आनंद मला कधीच वाटला नाही," असेही नाना यांनी बोलताना सांगितले.

ज्यांनी नाटक केलं ते गेले

नटसम्राट नाटक न करता चित्रपट का केला असा प्रश्न विचारला असता नाना म्हणाले, “ज्यांनी ज्यांनी नटसम्राट नाटक केले ते गेले. ती भूमिका वठवण सोपं नाही, असे मला वाटते. डॉ. लागू व इतर कलाकारांनी त्या भूमिकेत अक्षरश: प्राण ओतले. ते मला जमले नसते. मी २५ प्रयोगही करू शकलो नसतो म्हणून चित्रपट करण्याचे ठरविले. कोणतीही भूमिका करताना मी माझ्या प्रेमात पडलो नाही, म्हणून समोरच्या प्रेक्षकांवर भरभरून प्रेम करू शकलो," असेही नाना पाटेकर यांनी ( Nana Patekar On Natsamrat ) नमूद केले.

कोणालाही मदत करताना कृपया फोटो काढू नका

नाम फाउंडेशनच्या कामाविषयी बोलताना नाना यांनी म्हटलं, “मागील तीन वर्षांत अनेक नागरिकांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी आणि सामान्य नागरिक अशा दोन्हींचा यामध्ये समावेश आहे. आज या सर्वांना मदतीची गरज आहे. त्यांना मदत करणे हे केवळ राजकारणी नाही तर आज आपल्या सर्वांचेच दायित्व आहे. ‘नाम’च्या वतीने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रत्येकी २५ हजार रुपये याप्रमाणे आजवर १० कोटी ७० लाख रुपयांची मदत केली आहे. कोणालाही मदत करताना कृपया फोटो काढू नका," अशी भावूक विनंतीही नाना पाटेकर यांनी उपस्थितांना ( Nana Patekar On Naam Foundation ) केली.

हेही वाचा - Navneet Rana Audio Clip : नवनीत राणांच्या त्या ऑडिओ क्लिपबाबत महिला आयोगाने मागीतला खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.