पुणे - खून झालेल्या एका सराईत गुन्हेगाराचा बिबवेवाडी परिसरातून वाढदिवस साजरा करताना हवेत पिस्तुल फिरवताना जयघोष करण्यात आला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करीत अक्षय उर्फ प्रसाद कानिटकर (वय 22, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे.
याआधीही घडला असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार माधव वाघाटे याचा खून झाला होता. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांनी दुचाकी रॅली काढली होती. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही असा प्रकार घडल्यानंतर पोलिसांवर चहूबाजूने टीका झाली होती. त्यानंतर पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतले होते.