ETV Bharat / city

Pune : धर्माच्या भिंती ओलांडून मोहम्मद आणि मोहिनी करत आहेत गणपती बाप्पाची सेवा - मुस्लीम परिवार दुकान दगडूशेठ मंंदिर

पुण्यात सामाजिक संदेश, एकात्मतेचा आणि मानवतेचा दर्शन घडविणारे टेके कुटुंबीय ( Pune Teke Family ) आहेत. जे 10 वर्षांहून अधिक काळापासून धर्माची भिंती ( Muslim Family Running Shop In Front Of Ganpati Temple ) ओलांडून गणपती बाप्पाची सेवा करत आहे.

Pune Teke Family
Pune Teke Family
author img

By

Published : Mar 24, 2022, 3:50 PM IST

पुणे - कर्नाटक येथील हिजाब प्रकरणानंतर ( Karnatak Hijab Case ) आत्ता कर्नाटक येथील मंदिराबाहेर गैर हिंदूंनी दुकानं न लावण्याबाबतची बँनर लागली आहेत. कर्नाटक येथे जरी धर्मा-धर्मातील वाद पेटत असेल तरी पुण्यात मात्र सामाजिक संदेश, एकात्मतेचा आणि मानवतेचा दर्शन घडविणारे टेके कुटुंबीय ( Pune Teke Family ) आहेत. जे 10 वर्षांहून अधिक काळापासून धर्माची भिंती ( Muslim Family Running Shop In Front Of Ganpati Temple ) ओलांडून गणपती बाप्पाची सेवा करत आहे.

प्रतिक्रिया

मोहम्मद आणि मोहिनी दोघेही नवरा-बायको - पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पूजा साहित्याची दुकाने आहे. या परिसरात एक दुकान आहे, टेके पूजा साहित्याची, जिथे बाप्पाच्या पूजा साहित्य, नारळ, छोट्या मोठ्या बाप्पाच्या मुर्त्या विकले जातात. हे दुकान चालवणारे मोहम्मद आणि मोहिनी हे दोघेही नवरा बायको असून गेल्या 27 वर्षांपासून हे दोघेही सुखी आणि एकात्मतेचा संदेश देत समाजात जगत आहे.

10 वर्षांपूर्वी स्वीकारला मुस्लीम धर्म - मोहम्मद मूळ नाव महेश हा लहानपणापासून याच दुकानात काम करत होता. ही दुकान पूर्वी एका मुस्लीम कुटुंबीय चालवत होते. तेव्हा पासून महेश यांच्यावर त्या कुटुंबाबरोबर राहत असल्याने त्यांनी 10 वर्षांपूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारला. पण आपल्या आयुष्यात तसेच बाप्पाच्या सेवेत कधीही कणभर कोणतंही विचार न आणता मोहम्मद पूजा साहित्य विक्री करत आहे. मोहम्मद आणि मोहिनी यांना 3 मुलं असून ते आपलं कुटुंब सुखी पद्धतीने चालवत आहे. विशेष म्हणजे कोणतंही सण-उत्सव असो, हे दोघेही दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, रमजान एकत्र साजरा करतात आणि मानवता हाच खरा धर्म असा संदेश देत आहे.

'बाप्पाची सेवा करत असताना आनंद होतो' - गेल्या 10 वर्षांपासून आमचं हे दुकान असून आम्ही या दुकानात बाप्पाची मूर्ती, पूजा साहित्य, नारळ विक्री करत आहोत. येणारे जाणारे प्रत्येक भाविक हे मला बघतात आणि येऊन आवर्जून विचारतात की तुम्ही मुस्लीम आहे. मी ही सांगतो की हो आणि ते माझ्या दुकानातून पूजा साहित्य घेतात. आम्ही आमच्या आयुष्यात तसेच बाप्पाची सेवा करत असताना कधीच धर्म जात हे आणलं नाही, तर बाप्पाची सेवा करत असताना मलाही खूप चांगलं वाटत असल्याची प्रतिक्रिया यावेळी मोहम्मद याने दिली.

हेही वाचा - Terror threat to IPL matches: आयपीएलच्या सामन्यांवर दहशतवाद्यांचे सावट; एटीएसच्या अटकेत असलेल्या दहशतवाद्याची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.