ETV Bharat / city

...आता फक्त शेती करून चालणार नाही, शेतीला व्यवसायासह नोकरीची जोड हवी - पवार - शरद पवार प्रचार सभा चाकण

गेल्या काही दिवसांपासून देशात शेतजमीनीचे तुकडीकरण होत आहे, मात्र लोकसंख्या वाढत आहे. अशा परिस्थीतीत देशापुढे आणि महाराष्ट्रातही मोठे संकट निर्माण होण्याची भीती असून आता सर्वांनी शेती एके शेती करुन प्रपंच चालणार नाही. शेतीला नोकरी आणि व्यवसायाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार
author img

By

Published : Oct 12, 2019, 12:03 PM IST

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी पुण्याजवळ चाकण येथे आले होते. यावेळी सभेत बोलताना पवार यांनी राज्यातील शेतकरी वर्गाच्या समस्या, शेतीच्या समस्या, चाकण परिसरातील गुन्हेगारीची समस्या यावर सडेतोड भाष्य केले.

राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या चाकण येथील प्रचार सभेत बोलताना शरद पवार

महाराष्ट्रात आता फक्त शेती एके शेती करून चालणार नाही - पवार

स्वातंत्र्यावेळी देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती, तीच आता १२० कोटींवर जाऊन पोहोचली आहे. जगात लोकसंख्येबाबत आपला देश दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. यामुळेच शेतजमिनी, विविध औद्योगिक प्रकल्प, धरणे अशा अनेक कारणांमुळे शेतजमिनी कमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे कुटुंबांचे विभाजन होऊन शेतजमिनींचे वाटप होथ असल्याचे जमिनीचे मोठ्या प्रमाणात तुकडीकरण होत आहे. यामुळे आगामी काळात अनेक कुटुंब अल्पभुधारक व भूमीहिन होण्याची भीती पवारांनी यावेळी व्यक्त केली.

हेही वाचा... 'मागच्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारला मात्र देणं-घेणं नाही'

सध्याच्या काळात शेती करत असताना जमिनींच्या वाटपातून विभाजन होत आहे. तर काही जमिनीही कसदार राहिलेल्या नाहीत. त्यामुळे शेतमालाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची भीती आहे, अशावेळी शेतीला उद्योग अथवा नोकरीची जो़ड देण्याची गरज शरद पवारांनी यावेळी बोलून दाखवली.

चाकण औद्योगिक नगरीत गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसत आहे - पवार

चाकण औद्योगिक नगरीत जगातील कारखानदारी आली आहे. त्यामुळे चाकण औद्योगिक नगरीला एक ओळख निर्माण झाली, मात्र या उद्योगनगरीत आता चुकीच्या गोष्टी घडत आहे. औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी वाढली आहे. याबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेण्याची गरज होती मात्र तसेह होताना दिसत नाही. यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीची परिस्थिती बिगडली आहे. दुसरीकडे या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळण्याची गरज होती. मात्र तसे न घडता परराज्यातील लोकांना नोकऱ्या मिळत आहेत, त्यामुळे ज्या उद्देशाने औद्योगिक नगरीला उभारले त्याचे आजचे वास्तव पाहता, 'औद्योगिक वसाहत उभारली कशासाठी आणि झाले काय' असा सवाल शरद पवारांनी जाहीर सभेत केला.

हेही वाचा... देशात मॉब लिंचींग आहे, हे संघाने मान्य करावे; ओवैसींचे संघावर टिकास्त्र

खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांना सोडणार नाही

चाकण येथे मराठा समाजाचे आंदोलन झाले. त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्या हिंसक आंदोलनाचा ठपका माजी आमदार मोहिते पाटलांवर ठेवत सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पवार यावेळी म्हणाले. तसेच पाटील आणि आपल्यावर सूडबुद्धीने गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप पवारांनी यावेळी केला. राज्यसरकारला लोकांचा पाठिंबा मिळत नसल्याने हे असे राजकारण सरकार करत आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करु नका पुढे आपलेच सरकार येणार आहे. तेव्हा त्यांना सरळ करण्याची ताकद आपल्यात असून ज्यांनी खोटे काम केले, खोटे गुन्हा दाखल केले. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा इशारा शरद पवारांनी यावेळी दिला.

Intro:Anc_गेल्या काही दिवसांपासुन देशात शेतजमिन कमी होत चालली असुन लोकसंख्या मात्र वाढत असताना मोठ्या संकटाची भिती निर्माण झाली असुन आता सर्वांनी शेती एके शेती करुन प्रपंच चालणार नाही नसल्याचे वक्तव्य देशाचे माजी कृषीमंत्री शरद पवारांनी चाकण येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या प्रचार जाहिर सभेत शेतकरी वर्गाला संभोदित करताना वक्तव्य केले आहे

स्वातंत्र्यानंतर देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती आणि आज १२० कोटीवर येऊन पोहचलो आणि लोकसंख्येत आपला देश जगात दुस-या क्रमांकावर गेला आहे त्यातुन शेतजमिन विविध प्रकल्प,औद्योगिक, धरणे,अशा वेगवेगळ्या ठिकाणी शेतजमिनी कमी झाल्या तर दुसरीकडे कुटुंबांचे विभाजन होऊन शेतजमिनींचे वाटप होऊन अनेक कुटुंब आज अल्पभुधारक व भुमिहिन होत चालल्याची भिती शरद पवारांनी व्यक्त केली आहे

सध्याच्या काळात शेती करत असताना जमिनींच्या वाटपातुन विभाजण होत आहे तर जमिनीही कसदार राहिल्या नाही त्यामुळे शेतमालाच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची भिती माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी व्यक्त केली ते चाकण येथे राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते यांच्या प्रचार सभेत बोलत होते

चाकण औद्योगिक नगरीत गुन्हेगारी वाढली_शरद पवार

चाकण औद्योगिक नगरीत जगातील कारखानदारी आली आहे त्यामुळे चाकण औद्योगिक नगरीला एक ओळख निर्माण झाली मात्र या उद्योगनगरीत आता चुकीच्या गोष्टी घडत आहे या औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी वाढली आहे त्यामध्ये काहींनी चो-या केल्या आम्ही गुन्हेगारी मोडीत करण्याचा प्रयत्न केला मात्र राज्य सरकारने याबाबत कठोर भुमिका घेण्याची गरज होती मात्र त्याबाबत राज्य सरकारने ठोस भुमिका घेतली नाही त्यामुळे चाकण औद्योगिक वसाहतीची परिस्थिती भिगडली आहे तर दुसरीकडे या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळण्याची गरज होती मात्र तसं न घडता परराज्यातील लोकांना नोक-या मिळल्या त्यामुळे ज्या उद्देशाने औद्योगिक नगरीचा विस्तार वाढवला मात्र या परिसराचे हे भयानक वास्तव पाहिल्यानंतर "औद्योगिक वसाहत उभारली कशासाठी आणि झालंय काय" असा सवाल शरद पवारांनी चाकण येथील जाहिर सभेत केला...

खोटे गुन्हे दाखल करणा-या सोडणार नाही__शरद पवार

चाकण येथे मराठा समाजाचे आंदोलन झाले त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्या हिंसक आंदोलनाचा ठपका माजी आमदार मोहितेपाटलांवर ठेवुन सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आता चिंता करु नका मलाही असच एका गुन्ह्यात घेतलं आहे त्यामुळे आपण दोघेही आता एकाच लाईनमध्ये आहे मात्र कोन्हीतरी सांगायचं आणि आमच्यावर गुन्हा दाखल करायचा हे सूडबुद्धीने केलं जात असल्याचा आरोप यावेळी शरद पवारांनी करत राज्यसरकारला लक्ष करत त्यांना लोकांचा पाठिंबा मिळत नसल्याने हे असं राजकारण करत आहे त्यामुळे तुम्ही चिंत्ता करु नका पुढे आपलंच सरकार येणार आहे त्यामुळे यांना सरळ करण्याची ताकद आपल्यात असुन ज्यांनी खोटं काम करुन खोटा गुन्हा दाखल केले आहे त्यांना त्यांची जागा दाखवुन सोडणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी चाकण येथील जाहिर सभेत सांगितलेBody:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.