ETV Bharat / city

'माझ्या जीवाला धोका, प्लीज मला घेऊन चला'; रुपाली चाकणकरांनी टि्वट केला रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वर्धाचे खासदार रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ टि्वट केला आहे. 'माझ्या जीवाला धोका आहे, प्लीज मला घेऊन चला', अशी विनंती व्हिडिओमधील महिला करताना दिसत आहे.

author img

By

Published : Sep 8, 2021, 1:06 PM IST

MP Ramdas Tadas daughter in law pooja Alleged assault A plea for help to the NCPs Rupali Chakankar
रुपाली चाकणकर

पुणे - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटरवर एका महिलेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी महिला वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा तडस यांचा असल्याचा दावा चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला रडत असल्याचे दिसत असून रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागत आहे.

रुपाली चाकणकरांचे पोलिसांना आरोपीवर कारवाई करण्याचे आवाहन

12सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये संबंधित महिला रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची याचना करत आहे. 'मी पूजा, रूपालीताई चाकणकर यांच्याकडे मदत मागतेय. माझ्या जीवाला इथे धोका आहे. प्लीज मॅडम मला इथून घेऊन चला, मी विनंती करते', असे व्हिडिओमधील महिला म्हणताना दिसत आहे. याविषयी अधिक माहिती देताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, आज सकाळी माझ्या व्हाट्सअप नंबरवर हा व्हिडीओ आला. त्यानंतर संबंधित महिलेने मला फोन करून तडस कुटुंबीयांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. त्यानंतर मी संबंधित पोलीस आणि माझ्या महिला पदाधिकाऱ्यांना त्या महिलेला संरक्षण देण्यासाठी सांगितले आहे.

पोलिसांनीही या महिलेच्या संरक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ही महिला वर्ध्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रामदास तडस यांची सून आहे. तडस कुटुंबीय तिला मागील अनेक दिवसांपासून मानसिक त्रास देत आहेत. मारहाण करत आहेत. तडस कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून ही महिला प्रचंड घाबरलेली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी या महिलेची तक्रार नोंदवून घ्यावी आणि आणि आरोपींवर कडक कारवाई करावी, असे त्या म्हणाल्या. घरातील महिलेला त्रास देणे ही अत्यंत निंदनीय आहे. शेवटी लोकशाही पुढे आरोपी हा आरोपी असतो. आरोपीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली.

हेही वाचा - '.... यापेक्षा गाणे गाण्याकडे लक्ष द्या'; रुपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांना सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.