पुणे- मराठा आरक्षणावर मी शांत का, असे सारेजण विचारत आहेत. पण मी योग्य वेळ आल्यावर बोलेन, अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजी राजे ( Sambhaji Raje on Maratha reservation ) यांनी आज पुण्यात बोलताना मांडली आहे.
खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी म्हटले, की मराठा आरक्षणाबाबत पाच मुलभूत मुद्दे सरकारसमोर मांडले आहेत. त्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अनेक घटना घडत आहेत. त्यांनी ओबीसी आरक्षणावरदेखील भाष्य केले ( MP Sambhaji Raje on OBC Reservation ) आहे. केंद्र आणि राज्य सरकारने निर्णय घेवून लवकर इंपेरिकल डेटा ( MP Sambhaji Raje on imperical data ) गोळा करावा. ओबीसीवरती अन्याय होऊ देऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी ओबीसी आरक्षणावर मांडली आहे.
'EWS प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा उठविण्यासाठी प्रयत्न करावेत'
खासदार संभाजीराजे ( MP Sambhaji Raje visit president in Sept 2021 ) यांनी सप्टेंबर 2021 मध्ये राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. इंद्रा साहनी खटल्यात सांगितल्याप्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यासाठी विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजेच अतिदुरवर आणि अतिदुर्गम परिस्थिती सिद्ध करण्यासाठीचे निकष केंद्र सरकारमार्फत अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. अशी माहिती संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींकडे दिली होती. तसे, शक्य होणार नसेल तर (EWS)प्रमाणे 50 टक्क्यांची मर्यादा उठवण्यासाठी प्रयत्न करावेत. यामुळे देशातील अनेक राज्यांतील आरक्षण प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल, असेही मतही संभाजीराजेंनी राष्ट्रपतींपुढे व्यक्त केले होते.
हेही वाचा- Maratha Reservation : मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख