ETV Bharat / city

पिंपरीत 31 डिसेंबरला नाईट कर्फ्यू; २ हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज

नव वर्षाच्या स्वागतासाठी पुणे आणि पिपरी चिंचवडकर सज्ज झाले आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महानगरांमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. तर, काही नागरिकांनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे. प्रशासनाकडून नियमांचे पालन करत नव्या वर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

pcmc police
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
author img

By

Published : Dec 31, 2020, 10:57 AM IST

पुणे - यंदा कोरोनाच्या सावटाखालीच सरत्या वर्षाला निरोप देत, २०२१ या वर्षाचे स्वागत करावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात नव वर्षाच्या स्वागतावेळी अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. त्याचबरोबर अवैद्य दारू विक्री करणाऱ्या हॉटेल्सवर पोलिसांची पाच पथके करडी नजर ठेवणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.

नाईट कर्फ्युमुळे नागरिकांचा हिरमोड-

दरवर्षी 31 डिसेंबर रोजी नूतन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक जण सज्ज असतात. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि महानगर पालिकांच्या क्षेत्रांमध्ये लागू करण्यात आलेला नाईट कर्फ्यूमुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. तर, काही नागरिकांनी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचं बंदोबस्त; अवैद्य दारू विक्रीवर लक्ष

नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. चौकांमध्ये नाकाबंदी, चेक पॉईंट, विविध भागात गस्त या सर्वांचा यात समावेश करण्यात आला आहे. तसेच सामाजिक सुरक्षा पथकासह नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणखी पाच पथके अवैद्य दारू विक्रीवर लक्ष ठेवणार आहेत. नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने मद्यपान करून रस्त्यावर गोंधळ घालने, पार्टी करणे, वाहन चालवणे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर या पथकांकडून थेट कारवाई केली जाणार आहे.

नियमांचे पालन करून नूतन वर्षाच स्वागत करा

नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून नूतन वर्षाचे स्वागत करावे, नाईट कर्फ्यू काळात कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी नागरिकांना केले आहे. त्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत असताना नियमांचे उल्लंघन न करता नवीन वर्षाच स्वागत करावे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.