ETV Bharat / city

गुरुवारी पुण्यात ४ हजार ८९५ नव्या कोरोना रुग्णांची वाढ - पुणे कोरोना रुग्णसंख्या

गुरुवारी दिवसभरात पुण्यात कोरोनाबाधित ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील २८ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात १३९२ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख १५ हजार ३९९ झाली आहे तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ४४ हजार २०३ आहे.

पुणे
पुणे
author img

By

Published : Apr 29, 2021, 9:56 PM IST

पुणे - शहरात गेले सहा-सात दिवस कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ही बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी होती, नवे रुग्ण कमी होताना दिसत होते. मात्र, गुरुवारी २९ एप्रिलला पुन्हा एकदा नव्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. गुरुवारी दिवसभरात ४ हजार८९५ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात ४ हजार ६८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

गुरुवारी दिवसभरात पुण्यात कोरोनाबाधित ९१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील २८ रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सध्या शहरात १३९२ अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख १५ हजार ३९९ झाली आहे तर पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ४४ हजार २०३ आहे. शहरात आतापर्यंत एकूण मृत्यू ६,७३२ झाले आहेत. आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३ लाख ६४ हजार ४६४ इतके झाले आहेत. आज शहरात २० हजार ५०१ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.