ETV Bharat / city

Pune Nana Peth Murder Case : आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, समर्थ पोलीस स्टेशनवर रहिवाशांचा मोर्चा; पाहा तो थरारक व्हिडिओ

author img

By

Published : Jul 28, 2022, 9:41 PM IST

Updated : Jul 28, 2022, 10:24 PM IST

पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात सोमवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून ( stabbed death ) तसेच डोक्यात सिमेंटचे ब्लॉक घालून निर्घृण खून ( Brutal murder ) करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यामागणीसाठी नाना पेठ नवा वाडा येथील तब्बल 300 हून अधिक रहिवाशांनी समर्थ पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा ( March to Samarth Police Station ) काढला आहे. अक्षय लक्ष्मण वल्लाळ ( Akshay Laxman Vallaal ) (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अतिशय भयानक पद्धतीने वल्लाळ याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती.

Pune Murder Case
पुणे खून प्रकरण

पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात सोमवारी मध्यरात्री पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून एका तरुणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून ( Brutal murder ) करण्यात आल्याची घटना घडली होती. यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षय वल्लाळ याच्या समर्थनार्थ तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी यामागणीसाठी नाना पेठ नवा वाडा येथील तब्बल 300 हून अधिक रहिवाशांनी समर्थ पोलीस स्टेशन पर्यंत मोर्चा काढला आहे.

पुणे नाना पेठ खून प्रकरण

आरोपीला शिक्षेची मागणी - आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासाठी नानावाडा येथील नागरिकांनी आज समर्थ पोलीस ठाण्यात मोर्चा नेला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक याची भेट घेऊन आरोपीना कडक शिक्षा ( Citizens demand to punish accused ) देत, या गुन्ह्यात त्याच्या घरातील सहभागी व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली. यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात तीनशेहून अधिक नागरीक जमा झाले होते. तसेच या खूनामागे मुंबईतील गँगचे कनेक्शन असण्याची शक्यता अशा परिस्थितीत नागरिक भीतीच्या छायेत आहेत. या दहशतीतून मुक्तता करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

पुणे हत्या प्रकरण

या प्रकरणी दोघांना अटक - अक्षय, तसेच आरोपी नाना पेठ परिसरातील नवा वाडा परिसरात राहतात. अक्षय वल्लाळ हा नानापेठ परिसरात सामाजिक कार्यकर्ता असून समाजात त्याची चांगली ओळख होती. यामुळेच आरोपी त्याच्यावर चिडून होते. याच कारणावरून त्यांचे यापूर्वी देखील भांडण झाले होते. दरम्यान सोमवारी मध्यरात्री अक्षय हा नानावाडा परिसरात मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आरोपींनी बेसावध असलेल्या अक्षय याच्यावर प्राण घातक हल्ला ( Assaulted ) केला. अवघ्या 30 सेकंदात आरोपींनी त्याच्यावर 35 वार केले. इतकेच नाही तर तो खाली पडल्यानंतर सिमेंटच्या ब्लॉकने त्याच्या डोक्यात वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू ( Akshay died during treatment ) झाला. या प्रकरणी पोलिसांनी महेश नारायण बुरा, किशोर अशोक शिंदे (दोघेही रा. नाना वाडा, नाना पेठ) यांना अटक केली आहे.

दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री पुणे शहरातील मध्यवर्ती नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आला (friend killed friend ) होता. यात अक्षय लक्ष्मण वल्लाळ (वय २८, रा. नवा वाडा, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अतिशय भयानक पद्धतीने वल्लाळ याच्यावर वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. एकूणच ही घटना का घडली. यामागील कारणे काय आहे हे जाणून घेऊया ..

कानाखाली मारल्याच्या रागातून खून - अक्षय वल्ल्याळ, किशोर शिंदे, महेश बोरा हे तिघेही नाना पेठ नवा वाडा येथ राहणारे जिगरी मित्र होते..म्हणतात ना मित्रा साठी काहीपण अशी त्यांची दोस्ती..एकत्र बसणे, फिरणे आणि मज्जा करणे अस या तिघांच्या दोस्ती चे किस्से... मात्र दहा महिन्यापूर्वी महेश आणि अक्षय यात किरकोळ वाद झाला आणि याच किरकोळ कारणावरून अक्षयने महेश च्या कानाखाली मारली. आणि येथूनच त्यांच्या मैत्रीत दरी आली.

मनातला राग हा टोकाला गेला - त्यानंतर भेटेल तिथे एकमेकांकडे रागाने पाहणे. विचारांशी एकमत न होणे. असे प्रकार दोघांमध्ये होत होते. त्यांच्यातील दुश्मनी वाढत होती. अक्षयची प्रतिमा मित्रपरिवारामध्ये चांगली होती. कोणाच्याही हाकेला धावणारा म्हणून अक्षयची ओळख होती. नाना पेठ येथील नवा वाडा येथे राहणारे यांचे अनेक मित्र हेअक्षयलाच प्राधान्य द्यायचे.आणि हेच वर्चस्व किशोरला वारंवार खटत होते. आणि यातूनच वाढत असलेला मनातला राग हा टोकाला गेला.

अक्षयच्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी - तसे पाहिले गेले तर मृत अक्षय आणि आरोपी महेश यांच्यावर आधी छोटे मोठे गुन्हे दाखल ( crimes filed against Akshay ) आहेत. मात्र दुसरा आरोपी किशोर यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. असे असताना एका दिवस अक्षयचे आता खूप झाले त्याचा कटा काढायचा असे महेश आणि किशोर यांनी ठरवले. आणि मग 27 तारखेच्या रात्री अक्षय आणि त्याचे काही मित्र नेहेमीच्या ठिकाणी कट्ट्यावर बसले होते. तिथे किशोर आणि महेश नेहेमी प्रमाणे आले काही कारणावरून किशोरने अक्षयसोबत वाद घालायला सुरवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. पहिला आरोपी महेशने खिशातून चाकू काढला आणि अक्षयवर सपासप 35 वार केले. ही दुश्मनी एवढ्या टोकाला गेली होती की फक्त वार करून ते थांबले नाहीत. किशोरने मोठा दगड उचलून अक्षयच्या डोक्यात घातला ( picked up big stone head ). यातच अक्षयचा मृत्यू झाला. मात्र दोन मित्रांची मनातली कुजबुज ही त्यांच्याच मित्राच्या जीवावर बेतली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी किशोर शिंदे ,महेश बोरा यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - Sushma Andhare joins Shiv Sena : कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, सुषमा अंधारेंनी घेतले शिवबंधन हाती

Last Updated : Jul 28, 2022, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.