ETV Bharat / city

MNS Activists In Pune : मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन पुण्यात मनसे आक्रमक

राज ठाकरे यांची शनिवारी(2 एप्रिल)रोजी मुंबईत शिवाजी पार्कमध्ये गुडी पाडव्यानिमीत्त सभा झाली. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वक्तव्य केले आहे. (MNS Mosque Loudspeaker Issue ) त्यानंतर महाराष्ट्रभर त्या वक्तव्याचे उलट-सुलट परिणाम दिसून आले आहेत. महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात त्या वाक्याची चर्चा सुरू आहे. आता या मुद्द्यावरुन पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

मशिदीवरील भोंगे
मशिदीवरील भोंगे
author img

By

Published : Apr 6, 2022, 3:49 PM IST

पुणे - राज ठाकरे यांची शनिवारी(2 एप्रिल)रोजी मुंबईत शिवाजी पार्कमध्ये गुडी पाडव्यानिमीत्त सभा झाली. त्या सभेत त्यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत वक्तव्य केले आहे. (The issue of bells on the mosque) त्यानंतर महाराष्ट्रभर त्या वक्तव्याचे उलट-सुलट परिणाम दिसून आले आहेत. महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात त्या वाक्याची चर्चा सुरू आहे. आता या मुद्द्यावरुन पुण्यात मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

पुण्यातील मनसेचे पोलिसांत पत्र
पुण्यातील मनसेचे पोलिसांत पत्र

दुप्पट पटीने स्पीकर लावू - पुणे शहर मनसेने शहरातील पोलीस स्टेशनला पत्र दिले आहे. डेक्कन परिसरातील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने हे पत्र दिले आहे. डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलीस स्टेशनला हे पत्र दिले आहे. दरम्यान, 4 दिवसांचा अल्टिमेटही दिला आहे. तसेच, भोंगे जर काढले नाहीत तर दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसा वाचली जाईल असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांची माहिती - शहराध्यक्ष वसंत मोरे यांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. त्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नाही. आम्ही शहरातील सर्व पोलीस स्टेशनला मशिदीवरचे भोंगे काढा म्हणून पत्र दिले आहेत. पोलिसांना तीन दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. तीन दिवसात शहरातील मशिदीवरचे भोंगे काढले नाहीत, तर आम्ही मशिदीसमोर स्पिकरवर हनुमान चालीसा लावणार आहोत असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - सीबाआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले; तर याचिकेवरील सुनावणीस न्यायाधीशांचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.