पुणे संस्कृतीक राजधानी असलेल्या पुणे शहरात नवरात्र उत्सव Navratri Festival In Pune असलेल्या पवित्र सणाच्या निमित्ताने पुण्यात सेक्स तंत्र Pune Sex Tantra शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Sex Tantra Camp सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशनच्या वतीने यंदाच्या नवरात्र उत्सवात 1 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत सेक्स तंत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याचे ऑनलाईन बुकिंग देखील घेण्यात येत आहे. या संदर्भातील एक जाहिरात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बाबत आज पुणे शहर मनसे महिला आघाडी आणि हिंदू महासभेच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं आहे.
मनसे स्टाईलने आंदोलन ज्यांनी कोणी नवरात्र उत्सवात या शिबिराच आयोजन केलं आहे. त्या आयोजकांवर मनसे महिला आघाडीची कारवाईची मागणी करण्यात आली आहे. आयोजकांवर कारवाई न केल्यास मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करणार, असा इशारा देखील यावेळी मनसे महिला शहराध्यक्षा वनिता वागस्कर यांनी दिला आहे. तसेच याबाबत हिंदू महासंघाच्या वतीने देखील पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्यात आलं आहे. हिंदू महासंघातर्फे जाहिरात फाडत या जाहिरातीचा निषेध करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण एक दोन आणि तीन ऑक्टोबर रोजी तीन दिवसीय शिबिराचा आयोजन करण्यात आले आहे. तरुण- तरुणींचा सहभाग असणार हे शिबिर निवासी शिबिर असणार आहे. ज्याची फी 15 हजार रुपये आहे. यात ध्यानधारणा आणि कामसूत्रातील लैंगिक क्रिया या संदर्भात या शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवरात्र उत्सवात 9 दिवस विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ, तसेच दांडिया अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते, पण यंदा अश्या पद्धतीने कार्यक्रम होत असून हे पुण्याच्या संस्कृतीसाठी धक्कादायक मानले जात आहे.