पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मंगळवार (दि. 2 ऑगस्ट)रोरी पुणे दौऱ्यावर असताना माजी मंत्री तसेच आमदार उदय सामंत यांच्यावर कात्रज चौक येथे हल्ला करण्यात आला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. पण असे असले तरी काल मुख्यमंत्री यांचा हडपसर येथील कार्यक्रम झाल्यानंतर ते आमदार तानाजी सावंत यांच्या घरी येत असताना कॅनवाचा मार्ग जो दिला होता त्या मार्गाने आमदार उदय सामंत आले नाहीत. ते दुसऱ्या मार्गाने आले आणि त्यांच्यावर हल्ला झाला एकूणच आमदार उदय सामंत यांनी हा मार्ग का निवडला. याबाबत राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
कात्रज चौक येथे सभा असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा हडपसरला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात हडपसर येथील माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या येथील कार्यक्रमानंतर आमदार तानाजी सावंत यांच्या घरी भेट देणार होते. त्याचवेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कात्रज चौक येथे सभा असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा हडपसर येथून ज्या मार्गाने जात होता, त्या मार्गने आमदार उदय सामंत यांनी न जाता त्यांनी दुसरा मार्ग निवडला आणि ते कात्रज चौकात आले. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. एकूणच सामंत यांनी वेगळा मार्ग का निवडला याबाबत राजकीय चर्चेला उधाण आल आहे.
निसर्ग हॅाटेलला जेवण्यासाठी जात होते - उदय सामंत हे ठरवून दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कॅानव्हॅायचा मार्ग सोडून निसर्ग हॅाटेलला जेवण्यासाठी निघाले होते. त्यांनी गूगल मॅ हून निसर्गला जाण्यासाठी रस्ता निवडला. त्यामुळे ते आदित्य ठाकरेच्या सभेच्या ठिकाणी पोहोचले. अशी माहिती यावेळी सूत्रांनी दिली.
हेही वाचा - Uday Samant : 'सहनशीलतेचा अंत पाहू नका...', उदय सामंतांचा शिवसैनिकांना धमकीवजा इशारा