पुणे: पुण्यात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पुण्याच्या कोंढवे धावडे परिसरात एका अल्पवयीन मुलीने युट्यूबवर व्हिडिओ पाहून स्वतःचीच प्रसूती केली (birth child Watching YouTube) आणि बाळ जन्मल्यानंतर त्याला इमारतीवरून खाली फेकल्याचा (Child threw up from building) धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवे धावडे या भागात (Pune Kondve Dhwade Area) हा प्रकार घडला आहे. या घटनेबाबत उत्तम नगर पोलिस ठाण्यात (Uttam Nagar Police Thane Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (latest News from Pune) (Pune Crime)
सोसायटीच्या परिसरात आढळले मृत अर्भक- पुण्यातील कोंढवे धावडे परिसरात एका अल्पवयीन मुलगी आणि तिची आई या दोघी राहतात. मुलीच पोट दुखत आहे म्हणून आईने जवळ असणाऱ्या खासगी दवाखान्यात मुलीला घेऊन गेल्या होत्या. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर मुलगी गर्भवती असण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली. त्यानुसार डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मात्र, या गोष्टीकडे मुलीची आई आणि त्या मुलीने दुर्लक्ष केले; मात्र काही दिवसानंतर गर्भाच्या पिशवीला सूज आल्याने मुलीचे पोट दुखत असल्याचे मुलीच्या आईने शेजाऱ्यांना सांगितले आणि नंतर दुर्लक्ष केले. मात्र काही दिवसानंतर ते रहात असलेल्या सोसायटीच्या परिसरात एक नवजात अर्भक आढळून आले. एका अल्पवयीन मुलीला देखील रात्री उशिरा वेळी दवाखान्यात दखल करण्यात आले होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
महिला आयोगाने घेतली दखल : या गोष्टीचा पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी या प्रकरणाची माहिती संबधित मुलीकडून घेतली. सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र नंतर तिने गुन्हा कबूल केला की, आपणच युट्युबवर व्हिडिओ पाहून स्वतःची प्रस्तुती केली आणि त्यानंतर बाळ फेकून दिल्याची कबुली तिने दिली आहे. याप्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला आयोगाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.