पुणे : महविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मॉल तसेच दुकानाच्या माध्यमातून वाईन विक्री होणार (sale of wine in mall by Mahavikas Aghadi Govt) आहे, असा निर्णय घेण्यात आला होता. यावर मंत्री शंभूराजे देसाई यांना विचारला असता ते म्हणाले की, याबाबत लोकांच्या हरकती मागवण्यात आल्या आहे. जुलैमध्ये त्या आमच्याकडे आल्या आहे. मागच्या दोन महिन्यांतील राजकीय गडबडीमुळे मंत्री म्हणून मला पाहता आलेला नाही. या निर्णयाच्या विरोधात किती बाजूने किती, आणि स्थिर किती लोक आहे याबाबत माहिती घेण्यात येणार आहे. तसेच याबाबत ग्रामीण आणि शहरी लोकांचं काय म्हणणं आहे ? हे देखील पाहण्यात येणार आहे. आणि मग मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्यासमोर ते सादर करण्यात येईल आणि मगच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल ,असं यावेळी शंभूराजे देसाई म्हणाले. पुण्यात शंभूराजे देसाई यांची पत्रकार परिषद (Press conference Pune) आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत (Shambhuraje Desai regarding sale of wine in mall) होते.
काल शिवसेनेच्या वतीने गटप्रमुख मेळावा घेण्यात आला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. याबाबत मंत्री शंभुराजे देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले की, आत्ता ते नाही ना तिथं बसायला. ते सध्या दुसऱ्याच खुर्चीवर आतमध्ये बसले, आत्ता काय करायचं ? असा टोला यावेळी देसाई (sale of wine in mall) यांनी राऊत यांना लगावला आहे.
आजही ठाकरे परिवाराला मानस - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिंदे गट आणि शिवसैनिकांच्या वतीने आरोप - प्रत्यारोप करण्यात येत आहे. यावर राज्याचे मंत्री शंभुराजे देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले की, सुरवात आम्ही करत नाही, तेच सुरवात करतात. आम्ही कधीही पाहिले बोलत नाही. ते सुरवातीला आरोप करत असतात. आजही आम्ही ठाकरे परिवाराला मानस देतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे ते कुटुंब आहे, त्यांचा नेहमी आमच्यासाठी मानसन्मान आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गर्वगर्जना यात्रा राज्यात सुरु आहे. सातारा, सोलापूर,अहमदनगर आणि पुण्याची जबाबदारी ही माझ्याकडे होती.आ म्ही सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा करत असतो. लोकांचा सहकार्य तसेच विशेष करून तरुणांचं सहभाग हा आम्हाला मिळत आहे. आज लोकांना जे पाहिजे होत की, भाजप आणि शिवसेनाची जी नैसर्गिक युती होती तीच व्हायला हवी होती. ही इच्छा आज पूर्ण झाल्याने लोकांचा आम्हाला सहकार्य मिळत आहे.
दसरा मेळाव्याबाबत देसाई यांना विचारलं असता ते म्हणाले की, दसरा मेळाव्याची बाबा ही आत्ता न्याय प्रविष्ठ झाली आहे. आम्ही कायद्याचे पालन करणारे कार्यकर्ते आहे. आम्ही दोन्ही जागांवर परवानगी मागितली आहे. प्रशासक जिथं आम्हाला परवानगी देईल आम्ही त्या ठिकाणी मेळावा करू. (Minister Shambhuraje Desai )