ETV Bharat / city

Minister Chhagan Bhujbal on Hijab : राजकारण्यांनी महाविद्यालयात विष फैलावू नये, सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे - मंत्री छगन भुजबळ

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ( OBC Political Reservation ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांसह आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. गरज पडली त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचेही सहकार्य मिळाले आहे. लवकरच सर्वांना हक्क मिळेल. यासाठी समाजातही भांडण होता कामा नये. कायद्याच्या माध्यमातून सर्व प्रश्न आम्ही सोडवू, असे मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Feb 14, 2022, 3:35 PM IST

पुणे - नुकतेच कर्नाटक येथील हिजाब प्रकरणानंतर राज्यात देखील ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली आहेत. हिजाब प्रकरणावर आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Minister Chhagan Bhujbal ) यांनी देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, स्त्री पुरुषाला समान न्याय मिळाला पाहिजे, सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, असा विचार सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा होता. मात्र, अलीकडे काही राजकारणी देशातील विविध धर्मांत विष फैलावत असून आता ते महाविद्यालयापर्यंत पोहोचले आहे. सर्व धर्मीयांना शिक्षण मिळाले पाहिजे, महाविद्यालयात धर्मांबद्दल विष फैलावू नका. मुलांना शिक्षण घेऊ द्या. सध्या कर्नाटकात जे चालले आहे ते थांबले आहे आणि आपल्याकडे तर हे यायलाच नको, असेही मंत्री भुजबळ म्हणाले. ते पुणे विद्यापीठातील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात बोलत होते.

बोलताना मंत्री छगन भुजबळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ( Savitribai Phule Pune University ) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थिती लावली. तर यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ ( Mayor Murlidhar Mohol ), विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे ( Deputy Speaker of the Legislative Council Neelam Gorhe ), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ),अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Higher Education Minister Uday Samant ), सुनेत्रा पवार, विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर ( Vice Chancellor Nitin Karmalkar ), प्र कुलगुरू डॉ. एस. एन. उमराणी आदी उपस्थित होते.

ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध - ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी ( OBC Political Reservation ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) यांसह आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. गरज पडली त्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचेही सहकार्य मिळाले आहे. लवकरच सर्वांना हक्क मिळेल. यासाठी समाजातही भांडण होता कामा नये. कायद्याच्या माध्यमातून सर्व प्रश्न आम्ही सोडवू, असेही यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - Valentine's Day Special : देवता अन् राहुल यांची 'डोळस' प्रेम कथा, सामाजिक मानसिकतेला दिला छेद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.