ETV Bharat / city

Minister Chandrakant Patil : मी वेडा नव्हतो अडीच वर्षापासून सरकार आणण्याचा प्लॅन-चंद्रकांत पाटील - चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

भारतीय जनता पार्टीने राज्यातील शिवसेनेच्या फुटीमध्ये आमचा काही वाटा नाहीये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला, पण काल स्वतः उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मान्य केलं आहे - की अडीच वर्षापासून आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत (Chandrakant Patil spoke on BJP Shiv Sena alliance) होतो. असं चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमात सांगितलेलं (Minister Chandrakant Patil in Pune) आहे.

Minister Chandrakant Patil
उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
author img

By

Published : Oct 7, 2022, 9:09 AM IST

पुणे : भारतीय जनता पार्टीने राज्यातील शिवसेनेच्या फुटीमध्ये आमचा काही वाटा नाहीये सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला, पण काल स्वतः उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मान्य केलं आहे - की अडीच वर्षापासून आम्ही सरकार आणण्यासाठी प्लॅनिंग करत (Chandrakant Patil spoke on BJP Shiv Sena alliance) होतो. योग्य वेळ आल्यानंतर आपण आपले सरकार आणलेले आहे. त्यामुळे मी काय वेडा नव्हतो, मी सांगत होतो की - आपलं सरकार येणार आहे. त्यामुळे मला कार्यकर्त्यांचेही बळ वाढवता आलं, असं चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमात सांगितलेलं (Minister Chandrakant Patil in Pune) आहे.

स्वच्छ पुणे सुंदर पुणे - आम्हाला 'स्वच्छ पुणे सुंदर पुणे' करायचे आहे. मी शहरातील सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहे. लोकांचे प्रश्न सोडवणे आणि संघटना मजबूत करणे, पुणे सुरक्षित करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी म्हटले आहे. पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालकमंत्री झाल्यानंतर तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे सत्काराचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चंद्रकांत दादा पाटील बोलत होते. निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय होतो, असं म्हटलं जातं. परंतु जशा निवडणुका येतील तसा तसा विचार करून कार्यकर्त्याच्या भावनाचा विचार करू, असेही चंद्रकांत दादा पाटील (Minister Chandrakant Patil) म्हणाले.

प्रतिक्रिया देताना उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

मतदारसंघ रिबाँड करणार - जितेंद्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की - 2019 ला मी सहज पुण्यात आलो नाही. मला पुणे मिशन दिलं होतं. बारामती हा जिल्ह्यातील राजकारणाचा एक कणा आहे. बाकी जिल्ह्यातील सगळ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार आहे. पुणे महापालिका जिल्हा परिषद, पिंपरी चिंचवड महापालिका सगळं जिंकणार. सगळ्या मतदारसंघ रिबाँड करणार असल्याचा चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. जी जागा शिवसेनेच्या वाटेला जाईल, ती जागा देखील आपण निवडून आणली पाहिजे. असेही कार्यकर्त्यांना यावेळी त्यांनी सांगितलं (BJP Shiv Sena alliance)आहे.

भाजप शिवसेना युतीबाबत बोलताना, आम्ही युतीत असतानाही अनेक ठिकाणी स्वतंत्र स्थानिक स्वराज्य संस्था लढत होतो. आताही यापुढे परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल. शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप युतीच लढेल, पण स्थानिक स्वराज्य संस्थेत त्या-त्या परिस्थितीनुसार लढू, असेही यावेळी चंद्रकांत दादा म्हणाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये टीकेचे तंत्र नाही - 160 जागा हे विधानसभेमधलं आमचं लक्ष आहे. आणि ते विधानसभेतल्या युतीमध्ये आम्ही 160 जागा लढणार आहोत, असे चंद्रकांत दादा पाटील म्हणाले. त्याचबरोबर भास्कर जाधव यांच्या नारायण राणे टिकेवर उत्तर देताना राजकारणात कुठल्या पातळीवर जाऊन टीका करावी, हे महाराष्ट्रामध्ये आता तंत्र राहिलं नाही. असे म्हणत त्याने शिवसेनेवरही टीका केली आहे. दसरा मेळाव्यामध्ये मी उध्दव ठाकरे यांचं भाषण ऐकलं नाही. मात्र वेळ काढून रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं. असेही चंद्रकांत दादा पाटील म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.