ETV Bharat / city

Chandrakant Patil : पुणेकरांनी गणेशोत्सवात थोडा अतिरेकच केला - चंद्रकांत पाटील - पुणेकरांनी गणेशोत्सवात थोडा अतिरेकच केला

पुण्यातील गणेशउत्सवाची मिरवणूक रेकॉर्डब्रेक ( Ganesh Utsava procession in Pune breaks record ) झाल्याने यावर्षी चर्चेचा विषय झाला होता. यामुळेच की काय पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil ) यांनी गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला तो टाळा अस वक्तव्य केले आहे. ( little excess in Ganeshotsav pune )

Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील
author img

By

Published : Sep 29, 2022, 6:19 PM IST

पिंपरी चिंचवड : कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव पार पडला. पण, पुण्यातील गणेशउत्सवाची मिरवणूक रेकॉर्डब्रेक ( Ganesh Utsava procession in Pune breaks record ) झाल्याने यावर्षी चर्चेचा विषय झाला होता. यामुळेच की काय पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील ( Guardian Minister Chandrakant Patil ) यांनी गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला तो टाळा अस वक्तव्य केले आहे. तसेच, शिवसेनेवर टीका केली आहे. ते पुण्याच्या वडगाव मावळमध्ये बोलत होते. ( little excess in Ganeshotsav pune )

अतिरेक केला तर निर्बंध येतात : चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी आणि गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडलेत. आता नवरात्र आणि दिवाळी सुरळीत पार पडेल. हिंदूंच्या उत्सवात बेशिस्त न होता सण पार पाडावेत. गणेशोत्सवात थोडा अतिरेक झाला. त्यामुळे अतिरेक टाळा, अतिरेक केला तर निर्बंध येतात, अस चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील

पब्लिक मेमरी बिलकुल शॉर्ट नाही : शिवसेनेच्या मुखपत्रात आज भाजप आणि शिंदे गटावर टीका करण्यात आली. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, माझा तो बाब्या असं शिवसेनेचं सुरू आहे. तुम्ही आधी काय केलं ? 2019 ला कसा विश्वासघात केला, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं हित पाहिलेलं आहे. तुम्ही तर घरी बसून होता. 2019 मध्ये युतीत लढले अन ज्यांना बाळासाहेबांवर नेहमी टीका केली त्यांच्यासोबत आघाडी केली. पब्लिक मेमरी बिलकुल शॉर्ट नाही. त्यामुळे लोकांना माहीत आहे.

राजकीय नेते हे समाजाला दिशा दाखवतात : छगन बुजबळ आणि प्रज्ञा ठाकूर वादग्रस्त व्यक्तव्यावर ते म्हणाले की, राजकीय नेते हे समाजाला दिशा दाखवतात. अशांनी प्रत्येक वक्तव्य हे विचारपूर्वकच करायला हवं. शेवटी लोकशाहीत आवाहन करणं इतकंच आपल्या हातात असतं. कारण लोकशाहीने अधिकारच इतके दिलेत की समोरचा म्हणेल तू कोण सांगणारा ? पण हे नक्की आहे की असं व्यक्त होण्यावर मर्यादा असायला हव्यात. जर तुम्हाला पटत नसेल तर त्यांनी ते अमलात आणू नये.

पंकजा ताई स्वप्नांत ही असं म्हणणार नाहीत : पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की, मोदी, शहा, नड्डा या नेत्यांबद्दल आम्हाला नेहमीच आदर असतो. पंकजा ताई स्वप्नांत ही असं म्हणणार नाहीत. बऱ्याचदा आपण मागचा पुढचा संदर्भ आपण सोडतो, मधल्या वाक्याचा अर्थ तसा होतो. त्यामुळे आमचं केंद्रीय नेतृत्व याबाबत गैरसमज करून घेणार नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.