पुणे - कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी या प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगासमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. एकबोटे यांची शुक्रवारी मुंबईमध्ये आयोगासमोर चौकशी होणार होती. मात्र, कोरेगाव भीमा प्रकरणी जातीय तेढ पसरवल्याचे आपल्यावरील आरोप खोटे असल्याचे एकबोटेंनी म्हटले आहे.
हेही वाचा... बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
पुण्यातील कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 ला झालेल्या हिंसाचार प्रकरणातील आरोपी असलेले मिलिंद एकबोटे यांनी, शुक्रवारी या प्रकरणात नेमलेल्या चौकशी आयोगासमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी जातीय तेढ पसरवल्याचे आपल्यावरील आरोप खोटे आणि राजकीय हेतूने केले आहेत, असे एकबोटे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा...जळगावात भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा राडा; दानवे, महाजनांवर फेकली शाई
या प्रकरणाची चार्जशीट अद्याप दाखल झालेली नाही. तसेच राज्यात आता जे नवीन सरकार आले आहे, ते पुन्हा माझी चौकशी करू शकतात, असेही मिलिंद एकबोटे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... लंकेश हत्या प्रकरण: हृषीकेश देवडीकर औरंगाबादेत चालवायचा पतंजलीचे दुकान
मिलिंद एकबोटे यांनी, आपणास चौकशी आयोगासमोर साक्ष द्यायची नाही. असे आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच आयोगानेही याला होकार दिला आहे, अशी माहिती वकील आशिष सातपुते यांनी दिली.