पुणे : पुण्यातील खडकवासला धरणाच्या (Khadakwasla dam area youth beaten) मागच्या बाजूला तरुणीच्या वेशात फिरणाऱ्या एका परप्रांतीय तरुणाला काठी व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण (Migrant youth gang beating) करण्यात आली आहे. या परप्रांतीय तरुणाला का अशी बेदम मारहाण (Migrant Youth mob lynching Pune) करण्यात आली आहे. याबाबत कारण अस्पष्ट आहे. (disguised as young woman in Pune)
मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल- पुण्यातील खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या पुलावर ही मारहाण झाल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. मारहाणीचे कारण अस्पष्ट आहे; मात्र संशयास्पद वर्तवणुकीमुळे मारहाण झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मुले चोरीच्या संशयातून मारहाणीच्या घटनेत वाढ- बुरखा घालून आपल्या प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराला नागरिकांनी मुलं चोरणारा समजून बेदम चोप दिल्याच्या घटना देशात सतत घडत आहेत. नाशिकच्या वडाळा भागात अशीच घटना घडली. नाशिकमध्ये मुलं पळवणारी टोळी फिरत असल्याचा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल message viral on social media होत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे.
प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा परिधान करून गेल्याने मारहाण- नाशिक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुले पळवणारी टोळी फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचाच फटका वडाळा भागात एका प्रियकराला बसला आहे. प्रियसीला भेटण्यासाठी बुरखा परिधान करून आलेल्या प्रियकराला मुलं चोरणारा समजून नागरिकांनी बेदम चोप दिला.
मुलं पळवणारा समजून प्रियकराला नागरिकांनी दिला चोप - यावेळी मोठी गर्दी जमा झाली होती. जमलेली गर्दी पाहता पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या जमावातून प्रियकराला बाहेर काढले. याप्रकारची चौकशी केल्यानंतर हा संशयित आपल्या प्रियसीला भेटण्यासाठी आला असल्याचे उघड झाले. मुलं पळवणारा असल्याचा संशय नागरिकांना आल्याने त्याला मारहाण करण्यात आली. नाशिकमध्ये मुलं चोर समजून मारहाणीच्या दोन घटना समोर घडल्या आहेत.