पुणे - शहरातील कोथरूड परिसरातल्या एका मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 14 वर्षाच्या मतिमंद मुलीने दुसऱ्या मजल्यावरून ढकलून दिल्याने तीस वर्षीय मतिमंद मुलीचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना डावी भुसारी कॉलनी परिसरात घडली.
ममता मोहन डोंगरे (वय 33) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी संस्थेतील एका 14 वर्षीय मतिमंद मुलीवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिता रामकिसन टापरे यांनी तक्रार दाखल केली होती.
सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान मध्ये घडली घटना-
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीत सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान ही मतिमंद मुलांची संस्था आहे. शनिवारी सायंकाळी 4.45 वाजता ममता डोंगरे ही संस्थेच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या जिन्यातील रॅम्पवरून चालत होती. यावेळी याच संस्थेतील मतिमंद मुलगी त्या ठिकाणी आली. तिने ममता डोंगरे हिला पाठीमागून पकडले आणि धक्का दिला. त्यावेळी डोंगेर ही जिन्यातून खाली पडल्याने गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.