ETV Bharat / city

Lok Sabha Election : मावळ मतदारसंघात ६ वाजेपर्यंत ५९.१२ टक्के मतदान

पुणे - महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मावळ मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली आहे. महाआघाडीकडून माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि महायुतीकडून श्रीरंग बारणे यांच्यात थेट लढत आहे. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला असून पवार कुटुंबियांसाठी ही लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. तर, बारणे यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढत असणार आहे.

पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे
author img

By

Published : Apr 29, 2019, 7:36 AM IST

Updated : Apr 29, 2019, 9:38 PM IST

Lok Sabha Election Live Updates :

  • ६.०० - मावळ मतदारसंघात ६ वाजेपर्यंत ५९.१२ टक्के मतदान
  • ५.०० - मावळ मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५२.७४ टक्के मतदान
  • ३.०० - मावळ मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२.३२ टक्के मतदान
  • २.०० - मावळ मतदारसंघात २ वाजेपर्यंत ३१.८५ टक्के मतदान
  • ११.०० - मावळ मतदारसंघात ११ वाजेपर्यंत १८.२३ टक्के मतदान
  • १०.४० - नेरळ गावातील ७० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड
  • ९.५५ - महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क. राष्ट्रवादीने सत्तेचा काळात कमावलेला पैसा निवडणुकीसाठी वापरल्याचा आरोप. म्हणाले, जनता सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहील.
  • ९.२० - कर्जत तालुक्यातील साळवड येथील मतदान केंद्र क्रमांक ३३ वरील ईव्हीएम १ तासापासून बंद, मशीन बंद पडल्याने मतदार गेले माघारी. फक्त ५० जणांनी केले मतदान.
  • ९.०० - मावळ मतदारसंघात ९ पर्यंत ५.६९ टक्के मतदान.
  • ७.०० - मावळ मतदारसंघात मतदानाला सुरुवात
    मावळ मतदारसंघ मतदान

मावळ लोकसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या २२ लाख ९७ हजार ४०५ एवढी आहे. तर या ठिकाणी मतदान केंद्रांची संख्या ही २ हजार ५०४ एवढी आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पनवेल विधानसभा मतदारसंघात ५ लाख ३९ हजार १८७, कर्जत विधानसभा मतदारसंघात २ लाख ७९ हजार ७९०, उरण विधानसभा मतदारसंघात २ लाख ९० हजार २७३, मावळ विधानसभा मतदारसंघात ३ लाख ३७ हजार ६५७, चिंचवड विधानसभा मतदारसंघात ५ लाख २ हजार ७४०, पिंपरी विधानसभा मतदार संघात ३ लाख ४७ हजार ७५८ मतदार आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत ६०.१६ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्याबरोबरच संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Apr 29, 2019, 9:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.