ETV Bharat / city

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या, चायनीज वस्तूंकडे ग्राहकांची पाठ

author img

By

Published : Nov 6, 2020, 7:56 PM IST

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचलाय. मागील काही दिवसांपासून पुण्यातील पुण्यात कोरणा रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी हळूहळू बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनीही आपली दुकाने सजवल्याचे चित्र दिसते. परंतु मालाला म्हणावा तसा दरवर्षीप्रमाणे उठाव दिसत नाही.

पुणे दिवाळी खरेदी न्यूज
पुणे दिवाळी खरेदी न्यूज

पुणे - दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचलाय. मागील काही दिवसांपासून पुण्यातील पुण्यात कोरणा रुग्णांची संख्या कमी होत असतानाच आता नागरिक दिवाळीच्या खरेदीसाठी हळूहळू बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनीही आपली दुकाने सजवल्याचे चित्र दिसते. पुणे शहरातील मुख्य रस्त्याबरोबरच इतर महत्वाच्या ठिकाणी पणती, आकाश कंदील, फटाके, रांगोळी, कपड्यांचे दुकान यांचे स्टॉल उभारलेले पाहायला मिळतात. परंतु असे असले तरी ही बाजारपेठेत पूर्वीसारखा उत्साह नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या
यंदाच्या दिवाळीत मालाला उठाव नाहीदिवाळी सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आकाश कंदील आणि दिव्यांच्या माळा खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असतो. परंतु यंदा ही परिस्थिती नसल्याचे बाजारपेठेतली विक्रेत्यांचे म्हणणे आहे. फटाक्यांच्या माळांची विक्री करणारे सारडा म्हणाले, मागील वर्षी जशी दिवाळी होती तशी परिस्थिती यंदाच्या दिवाळीत दिसत नाही. यंदा दिव्यांच्या माळाच्या विक्रित 90 टक्के घट झाली आहे. दिवाळीनिमित्त आम्ही नवीन माळ आणून ठेवला आहे. परंतु या मालाला म्हणावा तसा उठाव दिसत नाही. चायनीज वस्तूंकडे ग्राहकांची पाठभारत आणि चीन दरम्यान मागील काही दिवसात झालेल्या संघर्षानंतर चायनीज मालावर बहिष्कार टाकण्याची मोहीम देशभरात झालेली होती. ही मोहीम अजूनही सुरूच असल्याचे दिसत आहे. कारण दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडलेले नागरिक स्वदेशी वस्तूंची मागणी करताना दिसतात. मागील वर्षापेक्षा यावर्षी चायनीज वस्तूच्या मागणीत चाळीस टक्क्यांनी घट झाली आहे. भारतीय बनावटीच्या वस्तू मध्ये जास्त व्हरायटीज नाही. परंतु असे असले तरीही ग्राहकांना चीन बनावटीच्या वस्तू नकोच असल्याचे चित्र बाजारपेठेत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.पणती विक्रेत्यांनी कुंभार गल्ली गजबजलीदिवाळीच्या कालावधीत घरोघरी पण त्यांची आरास पाहायला मिळते. या काळात आपण त्यांना मोठे मागणी असते. त्यामुळे दिवाळीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना पुण्यातील कुंभार गल्ली पणती विक्रेत्यांनी गजबजली आहे. या बाजारात मातीच्या विविध प्रकारच्या चाळीस पणत्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मातीच्या पणत्यांमध्ये यंदा शेकड्यामागे 20 रुपयांची वाढ झाली आहे. परंतु असं असलं तरीही कोरोनामुळे यंदा या बाजारपेठेत बाजारपेठेतही ग्राहकांची गर्दी दिसत नाही. कोरोनाचा परिणाम जसा इतर सणांवर झाला तसाच तो दिवाळी सणांवरही झाला असल्याचे पणती विक्रेते गणेश यादव यांनी सांगितले.
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या

हेही वाचा - दिवाळीचा उत्साह; रंगीबेरंगी कलात्मक पणत्यांनी सजले बाजार

काय काय उपलब्ध आहे बाजारपेठेत

कुंभार गल्ली येथील बाजारपेठेत सध्या दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांसाठी लागणारे किल्ले, पणत्या, खेळणी चित्रे, मावळे, शिवाजी महाराजांचे पुतळे, लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लक्ष्मी, बोळकी विविध प्रकारच्या पणत्या उपलब्ध आहेत.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठा सजल्या
किल्ल्याचीही मागणी घटलीदिवाळीच्या सुट्टीत लहान मुलं किल्ले बनवण्यात दंग असतात. काही ठिकाणी भव्य किल्ले स्पर्धाही आयोजित केल्या जातात. परंतु यंदा मात्र हा उत्साह दिसत नाही. दरवर्षी मातीच्या किल्ल्यांना मोठी मागणी असते. 10 ते 20 दिवस आधीचं बूकींग होत असते, मात्र यंदा लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका या व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे. किल्ल्याची 200 रुपयांची प्रतिकृती 80 रुपयांना देऊनही ग्राहक घेत नाहीत असे किल्ले विक्रेते तुलसीराम राठोड यांनी सांगितले. कोरोनाच्या अनुषंगाने घालून देण्यात आलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणीबचत गटाच्या माध्यमातून पणत्यांची विक्री करणाऱ्या प्रिया कुलकर्णी म्हणाल्या, बचत गटाच्या माध्यमातून आम्ही पणत्यांची विक्री करत असतो. हे करत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून देण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. हॅन्ड सॅनिटाईझ करणे, सोशल डिस्टन्सचे पालन केले जाते. लोकांच्या मनात अजूनही कोरोनाची धास्ती आहे. परंतु काळजी घेऊन लोक हळूहळू घराबाहेर पडत आहेत.

हेही वाचा - 'या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे': सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याने बनवले रेल्वेचे घर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.