पुणे - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे याबाबत भाषा अभ्यासक श्रीकांत बहुलकर यांनी आपली मते मांडली. पठारे समितीची शासनाने मराठी भाषेला अभिजात दर्जा असावा यासाठी समिती नेमली होती. कोणतीही भाषा अभिजात भाषा असावी यासाठी तीन निकष ठेवले होते. त्या भाषेला इतिहास किमान दीड हजार वर्षाचा असावा. त्यामध्ये खंड पडलेला असू शकेल. पण, तरीदेखील ती भाषा जुनी असली पाहिजे. त्या भाषेमध्ये जागतिक महत्त्वाची साहित्यनिर्मिती झाली पाहिजे. मराठी भाषेच्या बाबतीत हे तीनही निकष पूर्ण झाले आहेत.
दोन हजार वर्षांपूर्वी या महाराष्ट्रात जर कोणती भाषा बोली जायची तर ती प्राकृत भाषा बोलली जात होती. त्याला महाराष्ट्री प्राकृत भाषा, असे म्हणतात. त्यामध्ये गाथा सप्त सही हा फार मोठा ग्रंथ हा सातवाहन या राजाने निर्माण केला होता. त्या ग्रंथापासून महाराष्ट्री प्राकृत भाषेची परंपरा सुरू झाली. त्यामध्ये कालमानाने काही बदल होत आले आहेत. मात्र ,आपण जे मराठी बोलतो त्याचे मूळ हे इतके जुने आहे. या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांच्या गाथा, मध्ययुगीन साहित्य, आधुनिक विचारवंतांचे साहित्य, जागतिक महत्त्वाचे वाङ्मयवर या भाषेत निर्माण झालेला आहे.
या सगळ्याचा अभ्यास करून पठारे समितीने एकमताने शिफारस केली, की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. ज्यायोगे या भाषेचा इतिहास जुने ग्रंथ आधुनिक वाङ्मयवर याचा योग्य प्रकारे अभ्यास होईल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तर अभ्यास करता येईल. मराठी भाषेची पूर्वपीठिका तिचा कृषी आणि संस्कृत शास्त्र संबंध तसेच इतर भाषेचे सहसंबंध फार्सी भाषा संबंध हा सगळा भाग आहे त्याचा भाषाशास्त्रीय अभ्यास करता येईल. अप्रसिद्ध ग्रंथाचे प्रकाशन करता येईल. तौलनिक अभ्यास करता येईल. मराठी आणि इंग्रजी भाषेचा तौलनिक अभ्यास करता इंग्रजी वाङ्मयचा मराठी वाङ्मयवर पडलेला प्रभावही यातून आपला अभ्यासता येऊ शकेल.
हेही वाचा - Theatres in Pune : पुणे तेथे नाट्यगृह उणे... 'ईटीव्ही भारत' चा स्पेशल रिपोर्ट