पुणे - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) यांनी पक्षाचा मोठा गट फोडल्यानंतर आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पुण्यामध्ये शिवसेना ( Shivsena ) नेते आमदार तानाजी सावंत ( MLA Tanaji Sawant ) यांचे कार्यालय संतप्त शिवसैनिकांनी फोडले आहे. शिवसैनिक त्यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. शिवसैनिकांच्या या हल्ल्याचा मराठा क्रांती ठोक मोर्चाने निषेध व्यक्त करत तान्हाजी सावंत यांच्या कार्यालयात गुलाबाची फुले टाकून त्यांना समर्थन दर्शविला आहे.
गुलाबाची फुले टाकली - तानाजी सावंत यांच्या समर्थकांनी धनकवडी येथील ॲाफिसमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने गुलाबाची फुले टाकण्यात आली आहेत. ज्या तानाजी सावंतानी मराठा समाजासाठी नेहमीच पुढाकार घेतला त्यांच्या ॲाफिसवर भ्याड हल्ला होणे निषेधार्थ आहे. आम्ही गुलाबाची फुले टाकून तानाजी सावंतांना समर्थन देतो. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करावी ही आमची मागणी आहे. सावंत साहेबांनी शांततेचे अवाहन केले आहे. अन्यथा जशास तसे उत्तर देणार, असे यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी म्हटले आहे.