पुणे - मराठा समाजा करिता विविध कल्याणकारी योजना सारथी संस्थेच्या तारादूत प्रकल्पा अंतर्गत राबविण्यात येतात. मात्र सध्या कोणत्याही प्रकारचे काम केले जात नाही. या प्रकल्पाला गती देण्यात राज्य सरकार उदासीन दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा,अन्यथा व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळ त्वरित बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केली आहे. तसेच या मंडळाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी घ्यावी आणि तारादूत प्रकल्प मार्गी लावावा,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कुंजीर,सचिन आडेकर,बाळासाहेब अमराळे हे यावेळी उपस्थित होते. या मंडळाचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जबाबदारी घ्यावी आणि तारादूत प्रकल्प मार्गी लावावा,अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.