ETV Bharat / city

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर स्वत:ला पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी सुरेश पिंगळे यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर भाजल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन.

Suresh Pingale Suicide Attempt Pune
सुरेश पिंगळे
author img

By

Published : Aug 19, 2021, 7:33 PM IST

Updated : Aug 19, 2021, 8:21 PM IST

पुणे - पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर बुधवारी सुरेश पिंगळे यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर भाजल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच आज सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

माहिती देताना सुरेश पिंगळे यांच्या पत्नी, भाऊ आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'त्या' मंदिरातील पुतळा हटवला, बंद मंदिरासमोर राष्ट्रवादीचे आंदोलन

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर काल (18 ऑगस्ट) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सुरेश पिंगळे (वय 40 वर्षे) या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून घेतले होते. यामध्ये गंभीररीत्या भाजलेल्या सुरेश पिंगळे यांच्यावर सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या प्रकरणात सुरेश पिंगळे यांच्या पत्नीने पोलिसांवर आरोप केले आहेत.

पोलिसांचा हलगर्जीपणा जबाबदार - शामला पिंगळे

'नोकरीसाठी पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात असलेल्या व्हेरिफिकेशन कार्यालयात वारंवार चकरा मारूनही पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळाले नाही. त्यामुळेच सुरेश पिंगळे यांनी जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला', असे त्यांच्या पत्नी शामला पिंगळे यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा - पुण्यातील नरेंद्र मोदींच्या 'त्या' मंदिरातील मूर्ती रातोरात हलवली

Last Updated : Aug 19, 2021, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.