ETV Bharat / city

जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या - एकनाथ शिंदे

कोविड संकटात पहिली लाटेनंतर दुसरी लाट आली. आता कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनीच मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळून त्याला हरवावे असेही आवाहन त्यांनी केले.

एकनाथ शिंदे
Eknath shinde
author img

By

Published : Oct 10, 2021, 7:03 PM IST

पुणे - लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातील रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता संबंधित विकासकामे करणे अपेक्षित आहेत. त्याच पद्धतीने जनतेला उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळेल याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी व्यक्त केले.

उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळतील याकडे लक्ष द्या
पुणे महानगर पालिकेच्या महंमदवाडी, हडपसर येथील कै. दशरथ बळीबा भानुगरे रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे तसेच विविध विकासकामांचे लोकार्पण, भूमिपूजन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, सचिन अहिर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. नगरसेवकांनी आपण लोकांचे सेवक आहोत या दृष्टिकोनातून काम केले पाहिजे. जनतेच्या समस्या सोडवणे ही आपली जबाबदारी असल्याच्या भूमिकेतूनच लोकप्रतिनिधींनी काम करावे. लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत. त्यासाठी आपल्यातील सेवभावना कायम जिवंत ठेवावी, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - 'तुला पप्पांनी बोलावले' म्हणून अल्पवयीन मुलीला बळजबरीने नेले लॉजवर; नराधमाने केले 'असे' दुष्कृत्य

कोरोनाची पहिली लाट भयानक

कोविड संकटात पहिली लाटेनंतर दुसरी लाट आली. आता कोविडची तिसरी लाट येऊ नये म्हणून सर्वांनीच मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे ही काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनाचे नियम पाळून त्याला हरवावे असेही आवाहन त्यांनी केले. कोरोना काळात डॉक्टर्स, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस तसेच अन्य यंत्रणांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नागरिकांना उत्कृष्ट सेवा दिली, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी प्रास्ताविकात महंमदवाडी तसेच परिसरातील विकासकामांबाबत माहिती दिली.

डॉक्टरांचा गौरव

कोविड काळात उत्कृष्ट आरोग्यसेवा बजावलेल्या डॉ. दिलीप माने, डॉ. सचिन आबने, डॉ. मंगेश वाघ, डॉ. अशोक जैन, डॉ. राज कोद्रे, डॉ. पूनम कोद्रे, डॉ. श्रुती गोडबोले, डॉ. वंदना आबने, डॉ. मनीषा सोनवणे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. नितीन नेटके, डॉ. संपत डुंबरे पाटील यांचा विशेष कोविड-१९ योद्धा म्हणून गौरव करण्यात आला.
हेही वाचा - Cruise Drug Party Case : क्रुझवरील ड्रग्स प्रकरणी गोरेगावातून एका नायजेरियन व्यक्तीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.