ETV Bharat / city

पिरंगुट अपघातातील मृतांची संख्या वाढली; मद्यधुंद ट्रकचालकाने चिरडले होते दुचाकीस्वारांना - पुणे अपघात

मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे पिरंगुट घाट उतारावर ट्रकने (एम.एच १५ जीव्ही ९०११) दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली होती. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, दोन जण गंभीर जखमी होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

ट्रकने दुचाकीस्वारांना चिरडले
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:48 PM IST

Updated : Sep 11, 2019, 11:40 AM IST

पुणे - मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे पिरंगुट घाट उतारावर ट्रकने (एम.एच १५ जीव्ही ९०११) दुचाकींना धडक दिल्याची घटना घडली. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

रात्री नऊच्या दरम्यान घाट उतरावर वेगाने येणाऱ्या ट्रकने काही दुचाकींना धडक दिली. संबंधित ट्रकने ५ जणांना चिरडले. यानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलीस मयूर निंबाळकर व स्थानिक नागरिकांनी पकडले. ट्रक चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू तर, एक जण अजूनही अत्यवस्थ आहे. सुरज राठोड, या अत्यवस्थ तरुणाचा उपचारादरम्यान रात्री मृत्यू झाला.

हेही वाचा - संकटात सोडून मित्रांनी घेतला काढता पाय; शिवदुर्ग रेस्क्यू टीमने वाचवले तरुणाचे प्राण

मृतांची नावे वैष्णवी सोनवणे, पूजा पाटील (वय - 20-21), नागेश गव्हाणे (वय 20), सुरज राठोड (वय 21), अत्यवस्थ विठ्ठल भिलारे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत आणि जखमी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला होते. तर, वैष्णवी ही विप्रो या आयटी कंपनीत नोकरीला असल्याची पोलिसांची माहिती.

Intro:मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे पिरंगुट घाट उतारावर ट्रकने ( एम.एच १५ जीव्ही ९०११) धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

    राञी नऊच्या दरम्यान घाट उतरावर वेगाने येणाऱ्या ट्रकने काही दुचाकीना धडक दिली यात या ट्रकने पाच जणांना उडविले.यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहे.पळून जाणाऱ्या ट्रक चालकास घोटावडे फाटा येथे वाहतूक पोलिस मयूर निंबाळकर व इतर नागरिकांनी पकडला. हा ट्रक चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले तर मयताची नावे उशीरा पर्यत निष्पन्न झाली नव्हती.मयताचे मृतदेह पौड येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले तर जखमींना पिरंगुट येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.Body:..Conclusion:...
Last Updated : Sep 11, 2019, 11:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.